कोरोना व्हायरसमुळे देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे. मोदींनी सुरुवातीला लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत राहिल असे सांगितले होते, परंतु देशातील परिस्थिती न सुधारल्यान तो वाढवण्यात आला. लॉकडाऊनमुळे अनेकांना आहे त्या राज्यात अडकून रहावे लागले आहे. यामध्ये न्यूझीलंडचा माजी प्रशिक्षक माईक हेसन यांचाही समावेश होता. गेला महिनाभार हेसन हे बंगळुरू येथे अडकले होते आणि आता ते न्यूझीलंडमध्ये परतले आहेत.
हेसन हे विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे क्रिकेट संचालन निर्देशक आहेत. इंडियन प्रीमिअर लीगसाठी ते भारतात दाखल आले होते, परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना बंगळुरू येथेच रहावे लागले. भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांसाठी एक विशेष विमान सोडण्यात आले. त्यान हेसन मायदेशी परतले. मायदेशात पोहोचल्यानंतर त्यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल रद्द होण्याची चर्चा आहे. तरीही हेसन आगमी सत्रासाठी प्लानींग करत आहेत. ते म्हणाले,''RCB कडून माझी सर्व काळजी घेतली जात आहे. मी काम सुरूच ठेवले आहे. मी काही जुने व्हिडीओ पाहत आहे आणि नोट्स तयार करत आहे. त्यातून पुढील सत्राची रणनीती आखली जाऊ शकते. शिवाय मी जेवणंही बनवायचा प्रयत्न करत आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 विसरा, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलण्यात येणार; Shoaib Akhtarची भविष्यवाणी
विश्वनाथन आनंद अन् युजवेंद्र चहल यांनी उभारला लाखोंचा निधी; कचरा वेचणाऱ्यांना करणार मदत