Join us  

न्यूझीलंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू लाईफ सपोर्टवर; अचानक जमिनीवर कोसळला!

न्यूझीलंडचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू ख्रिस क्रेन हा अचानक कोसळला अन् त्याला आता लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 4:41 PM

Open in App

न्यूझीलंडचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू ख्रिस क्रेन हा अचानक कोसळला अन् त्याला आता लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे. ५१ वर्षीय ख्रिसवर आतापर्यंत अनेक शस्त्रक्रीय झाल्या आहेत. ख्रिसला हृदयासंदर्भातील समस्या असल्यानं त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आल्या होत्या, परंतु त्याच्या शरीरानं अपेक्षित प्रतिसाद न दिल्यानं त्याची प्रकृती खालावली होती, असे एका इंग्रजी वेबसाईटनं  सांगितले. ख्रिसच्या हृदयातील मुख्य धमणीला इजा झाली असून अशा समस्येला वैद्यकीय भाषेमध्ये aortic dissection असे म्हणतात.  त्यानं १९८९ ते २००६ दरम्यान न्यूझीलंडकडून २ ट्वेंटी-२०,  ६२ कसोटी आणि २१५ वन डे सामने खेळले आहेत.  नंतर तो समाचोलक म्हणून काम करायचा. कसोटीत त्यानं ५ शतकं व २२ अर्धशतकांसह ३३२० धावा केल्या आणि २१८ विकेट्स घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४ शतकं व २६ अर्धशतकांसह ४९५० धावा व २०१ विकेट्स आहेत.  

२००८ साली भारतात खेळवण्यात आलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये चंढीगड लायन्स संघाकडून खेळताना त्याच्यावर मॅच फिक्सिंग केल्याचे आरोप लावण्यात आले. मात्र त्याने हे सर्व आरोप फेटाळले होते आणि कायदेशीर लढाईही लढला होता. उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्याला बस डेपोंची साफसफाईचे काम करावे लागत असल्याच्या बातम्या २०१४मध्ये समोर आल्या होत्या.  

टॅग्स :न्यूझीलंडआॅस्ट्रेलिया
Open in App