Join us  

शाहिद आफ्रिदीच्या कुटुंबीयांचीही झाली कोरोना टेस्ट; पहिला अहवाल पॉझिटिव्ह आला अन्...

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यानं कोरोना व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 8:29 PM

Open in App

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी यानं कोरोना व्हायरसवर यशस्वीरित्या मात केली. 13 जूनला त्यानं कोरोना झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. त्यानंतर त्यानं घरीच उपचार घेतले. दरम्यान, त्याची प्रकृती खालावल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या, परंतु आफ्रिदीनं व्हिडीओ पोस्ट करून पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यानं योग्य उपचार व व्यायाम करत कोरोनावर मात केली. आफ्रिदीच्या कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि त्यांचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आफ्रिदीनं गुरुवारी कुटुंबीयांच्या कोरोना टेस्टबद्दल नवीन अपडेट दिली.

IPL 2020 भारतात होणार नाही; BCCIनं दिली महत्त्वाची अपडेट!

सौंदर्य अन् फिटनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींवरही भारी पडतेय 'ही' टीम इंडियाची खेळाडू!

पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं गुरुवारी ट्विट करून ही माहिती दिली. त्यात त्यानं लिहिलं की,''माझी पत्नी आणि मुलगी अक्सा आणि अंशा यांचा पहिला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली आणि आता अहवाल निगेटिव्ह आला आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे ते बरे झाले आहेत. आता कुटुंबीयांना वेळ द्यायचा आहे.'' 13 जूनला आफ्रिदीनं त्याला कोरोना झाल्याचे सांगितले होते. 20 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत आफ्रिदीनं 27 कसोटी, 398 वन डे आणि 99 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यानं वन डेत 806, कसोटीत 1716 आणि ट्वेंटी-20त 1416 धावा केल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 395 विकेट्स आहेत. ट्वेंटी-20 आणि कसोटीत त्यानं अनुक्रमे 98 आणि 48 विकेट्स घेतल्या आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

मानलं तुम्हाला; रितेश देशमुख आणि जेनेलियाचा अवयवदानाचा संकल्प!

कोरोनामुक्त होताच शाहिद आफ्रिदी काश्मीर मुद्द्यावर बरळला; केलं मोठं विधान

Cricket is Back: जेम्स अँडरसननं घेतली विकेट अन् खेळाडूंचं सोशल डिस्टन्सिंग सेलिब्रेशन

न्यूड फोटो शेअर करणाऱ्या महिला खेळाडूवर कारवाई; म्हणाली, स्वातंत्र्यावर घाला!

Video : ... म्हणून अजिंक्य रहाणेनं मानले सरकारचे आभार, शेतकऱ्यांबद्दल काढले गौरवौद्गार

धक्कादायक: यूनिस खाननं पाकिस्तानच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या गळ्यावर धरला होता चाकू  

इरफान पठाणनला दहशतवादी हाफिज सईद बनायचंय; नेटकऱ्याच्या पोस्टवर भडकला माजी क्रिकेटपटू

 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीकोरोना वायरस बातम्या