नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) आतापर्यंत एकूण 10 संघाची घोषणा झाली आहे. आज संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) देखील गुरूवारी पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वात पुन्हा एकदा पाकिस्तानी संघ विश्वचषकात दिसणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे संघातील प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीचे पुनरागमन झाले आहे. पायाच्या दुखापतीमुळे आफ्रिदी आशिया चषकातून बाहेर झाला होता. मात्र आगामी इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत आफ्रिदीला विश्रांती देण्यात आली आहे. पाकिस्तानचा संघ जाहीर होताच पाकिस्तानच्या माजी गोलंदाजाने पीसीबीची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका यांना टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागेल. ओमान ( फेब्रुवारी) आणि झिम्बाब्वे ( जून व जुलै) येथे दोन पात्रता स्पर्धा होणार आहेत आणि त्यातून संघ पहिल्या राऊंडमध्ये सुपर-12 मधील अंतिम चार संघांसाठी एकमेकांना आव्हान देतील. शाहिन आफ्रिदी, नसीम शाह व हॅरीस रौफ या त्रिकुटाच्या जोरावर पाकिस्तान भारतीय संघाची कोंडी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील वर्ल्ड कपमध्ये आफ्रिदीने भारताला दिलेले दणके अजूनही चाहत्यांच्या मनात ताजे आहेत.
पाकिस्तानच्या संघाचा माजी घातक गोलंदाज मोहम्मद आमिरने चिप ट्विट करत संघ निवड समितीवर टीका केली आहे. "मुख्य निवडकर्त्यांची स्वस्तातील निवड", अशा आशयाचे ट्विट करून आमिरने टीका केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे फखर जमानला संघात स्थान न मिळाल्याने पाकिस्तानचे माजी खेळाडू टीका करत असल्याचे बोलले जात आहे.
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादीर.
पाकिस्तानचे विश्वचषकातील सामने 23 ऑक्टोबर - वि. भारत, मेलबर्न27 ऑक्टोबर - वि. ब गटातील विजेता, पर्थ30 ऑक्टोबर - वि. अ गटातील उपविजेता, पर्थ3 नोव्हेंबर - वि. दक्षिण आफ्रिका, सिडनी6 नोव्हेंबर - वि. बांगलादेश, एडिलेड