Join us  

हे अति झालं, महिला क्रिकेटमध्ये असं कधी पाहिलं नव्हतं! Shahid Afridiची हरमनप्रीत कौरवर टीका

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) सध्या चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:42 PM

Open in App

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) सध्या चर्चेत आहे. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना हरमनप्रीतने यष्टिंवर बॅट आदळली. त्यानंतर प्रेझेंटेशन सोहळ्यात जाहीर नाराजी व्यक्त केली... कॅप्टन इथेच थांबली नाही, तर ट्रॉफी स्वीकारताना तिने अम्पायरलाही बोलवा, त्यांच्यामुळे मालिका बरोबरीत सुटलीय, असे म्हणून बांगलादेशच्या कर्णधाराचा अपमान केला. हरमनप्रीतच्या या वागण्यावर भारताच्या माजी खेळाडूंनी टीका केली. त्यात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानेही उडी घेतली आहे. 

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने अतिच केलं, असे मत आफ्रिदीने व्यक्त केले आहे. क्रिकेटमध्ये याआधीही असे प्रकार घडले आहेत, परंतु महिला क्रिकेटमध्ये अशा प्रकारे भावनांचा उद्रेक प्रथमच झाला असावा, असेही तो म्हणाला. ''हे भारतापूरते नाही. यापूर्वीही क्रिकेटमध्ये असे प्रकार आम्ही पाहिले आहेत. पण, महिला क्रिकेटमध्ये असं घडलं नव्हतं. यावेळी जरा अतिच झालं. तुम्ही कडक कारवाई करून चांगले उदाहरण ठेवले आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही आक्रमक व्हा, परंतु त्यावर नियंत्रण राखणेही गरजेचे आहे. यावेळी अति झालं,''असे आफ्रिदीने Samaa Tv सोबत बोलताना सांगितले.  

आयसीसीची कारवाईबांगलादेशविरुद्धच्या त्या कृतीनंतर आयसीसीनेही कारवाईचा बडगा उचलला आहे. तिच्यावर लेव्हल २ च्या अंतर्गत मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि ४ वजागुण दिले गेले आहेत. त्यामुळे तिला दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. आगामी काळात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशियाई स्पर्धेत खेळणार आहे. स्मृती मानधना उप कर्णधार असणार आहे. Asian Games 2023 ची स्पर्धा ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत चीनमध्ये पार पडेल. पण क्रिकेटचे सामने १९ ते २८ सप्टेंबरला होतील. दरम्यान, आयसीसीने भारतीय कर्णधारावर कारवाई केल्याने टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.  

टॅग्स :हरनमप्रीत कौरशाहिद अफ्रिदीभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App