Virat Kohli vs Babar Azam : भारताचा स्टार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यांच्यामध्ये वरचढ कोण, याची चर्चा फॅन्समध्ये सुरूच असते. आकड्यांवर नजर टाकल्यास विराट हा पाकिस्तानी फलंदाजापेक्षा बराच पुढे आहे, परंतु बाबरने भारतीय फलंदाजाच्या नावावर असेलेले बरेच विक्रम मोडले आहेत. त्यामुळेच त्याची तुलना विराटशी होत आहे. यात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानेही त्याचे मत मांडले आहे आणि यावरून नवा वाद सुरू होऊ शकतो.
२८ वर्षीय बाबरच्या खेळावर प्रभावित झालेल्या आफ्रिदीने नुकत्याच एका मुलाखतीत पाकिस्तानी कर्णधाराचे कौतुक केले. त्याच्यात मॅच विनर होण्याची क्षमता असल्याचे सांगून त्याला एक सल्लाही दिला आहे. ''बाबर आजम हा जगातील नंबर वनचा खेळाडू आहे यात शंका नाही आणि पाकिस्तान क्रिकेट संघाला त्याच्यावर गर्व आहे. पण, एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहली यांच्यासोबत नाव जोडण्यापासून त्याला एक गोष्ट रोखतेय आणि ती म्हणजे मॅच फिनिशर... बाबरने स्वतःला आतापर्यंत मॅच विनर म्हणून सिद्ध केलेले नाही.
यापूर्वीही २०२० मध्ये बाबरवर मॅच फिनिशिरच्या कौशल्यावरून माजी खेळाडूंनी टीका केली होती. बाबरने एका मुलाखतीत सांगितले की, खेळाडू जेव्हा खेळपट्टीवर स्थिरावरला असतो तेव्हा त्याने मॅच फिनिश करायला हवी. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावूनही मी सामना संपवू शकलो नाही आणि त्यामुळेच आम्ही ती मॅच गमावली असे मला वाटते. पण, मी माझ्या फलंदाजीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. मी अशा चुका भविष्यात करणार नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"