India vs Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या मेलबर्नवर झालेल्या सामन्याला ९० हजारांपर्यंत प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील तो सर्वाधिक प्रेक्षक उपस्थितीचा सामना ठरला. आता २०२३ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर येण्याची शक्यता आहे. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी रणकंदन पेटवले आहे. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला येणार नसेल, तर आम्ही भारतात होणारा वर्ल्ड कप खेळणार नाही, असा इशारा राजा यांनी दिलाय. आता या सर्व घडामोडीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) याने हास्यास्पद दावा केला आहे. भारतीयांना पाकिस्तानी क्रिकेटपटूंना प्रत्यक्ष खेळताना पाहायचे आहे, असे आफ्रिदीचे म्हणणे आहे.
टीम इंडियाला 'लॉटरी'! इंग्लंडकडून पाकिस्तानने लाज काढून घेतली; आपली वर्ल्ड कप फायनल निश्चित
आशिया चषक २०२३ स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे आणि जसे ठरलेय तसे झालेच तर भारतीय क्रिकेट संघ १६ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाईल. पण, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतीय संघ कोणत्याची स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही हे आधीच स्पष्ट केले आहे. त्यांनी आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली. त्यानंतर रमीझ राजाने वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने अजब दावा केला. पाकिस्तानने भारत दौऱ्यावर यावे ही तेथील लोकांचीच इच्छा असल्याचा दाव आफ्रिदीने केला आहे. ''पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध क्रिकेटमुळे नेहमीच सुधारले आहेत. भारतीयांनाही पाकिस्तानला भारतात क्रिकेट खेळताना पाहायचे आहे.''
पाकिस्तान २०१२-१३ साली अखेरचा भारत दौऱ्यावर आला होता आणि तेव्हा २ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका खेळला होता. मागील काही महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सामने झाले होते. आशिया चषक स्पर्धेत दोन सामन्यांत दोघांनी प्रत्येकी १-१ विजय मिळवला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विराट कोहलीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर ५ विकेट्सने रोमहर्षक विजय मिळवला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"