BJP mindset in BCCI is affecting Pakistan cricket - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर रमीझ राजा ( Ramiz Raja) काही बरळत सुटले आहेत. PCB च्या अध्यक्षपदावर असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCCI) आव्हान देण्याची भाषा करणारे राजा आता तर भारतीय जनता पार्टीवर टीका करत आहेत. रमीझ राजा यांनी BCCI मध्ये भाजपाच्या मानसिकतेचा प्रभाव असल्याने पाकिस्तान क्रिकेटला त्याचा फटका बसत असल्याचा दावा केला आहे.
हाय रे इश्क! Live मॅचमध्ये सर्फराज अहमद पत्नीला पाहत होता, न्यूझीलंडचा गोलंदाज खवळला, Video
लाहोर येथील Government College University च्या कार्यक्रमात राजा म्हणाले,''दुर्दैवाने काय होतंय माहित्येय, की भारतात भाजपाच्या मानसिकतेचा प्रभाव आहे. पाकिस्तान ज्युनियर लीग किंवा पाकिस्तान महिला लीग मी आणली. या स्पर्धांमधून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आर्थिक फायदा झाला असता आणि त्यातून पाकिस्तान क्रिकेटसाठी निधी उभा राहिला असता. त्यामुळे आयसीसीकडून येणाऱ्या निधीवर अवलंबून राहायला लागले नसते. सध्या त्याच निधीवर पाकिस्तान क्रिकेट सुरू आहे. ”
रमीझ राजा यांनी पुढे म्हटले की,''भारताकडे अनेक उप्तन्नाचे स्त्रोत आहेत आणि ते आयसीसीला सर्वाधिक महसूल देत आहेत. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचाही मोठा वाटा आहे. पाकिस्तानही हळुहळू पाऊल पुढे टाकत आहे. पण, इंग्लंड व ऑस्ट्रेलियाने आयसीसीच्या लीडरशीपमध्ये सक्रीय सहभाग घ्यायला हवा.''
आशिया चषक २०२३ चे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर येणार नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे रमीझ राजा यांचा प्रचंड संताप झाला होता. तेव्हा त्यांनी भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी सारवासारव केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"