Join us

"तुझी बायको खूप हॉट दिसते", चाहत्याची कमेंट; अक्रम संतापला, म्हणाला, "मला तुझ्या आई-वडिलांना..."

वसिम अक्रमने चाहत्यावर संताप व्यक्त केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 15:42 IST

Open in App

एकेकाळी पाकिस्तानी संघात वेगवान गोलंदाजांची फळी होती. जगातील सर्वात गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा माजी खेळाडू वसिम अक्रमची गणना केली जाते. अक्रम नेहमी चर्चेत असतो, कधी तो युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतो. तर कधी तो पाकिस्तानी संघातील खेळाडूंचे कान टोचतो, पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील भोंगळ कारभाराबद्दल भाष्य करताना दिसतो. मात्र, आता अक्रम एका चाहत्यावर चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. खरं तर झाले असे की, पाकिस्तानी दिग्गजाने नववर्षाच्या निमित्ताने पत्नीसोबत एक फोटो पोस्ट केला. ज्यावर एका चाहत्याने आक्षेर्पाह कमेंट केली. 

चाहत्यांची कमेंट पाहून अक्रमचा पारा चढला अन् त्याने खडेबोल सुनावले. अक्रमने पत्नी शनिरासोबतचा फोटो पोस्ट केला होता. मात्र, यानंतर एका चाहत्याने अक्रमच्या पोस्टवर एक आक्षेर्पाह कमेंट केली, जे पाहून वसिम अक्रम संतापला आणि त्याने त्या चाहत्यावर शाब्दिक हल्ला चढवला. 

चाहत्याची आक्षेर्पाह कमेंट अन्... अक्रमने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना एक फोटो पोस्ट केला. पत्नीसोबत पोस्ट केलेल्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये अक्रमने लिहिले, "आगामी वर्ष चांगले असेल अशी आशा आहे... तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना २०२४ साठी खूप सारे प्रेम, माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला नववर्षाच्या खूप शुभेच्छा."

वसिम अक्रमचा संताप दरम्यान, एका चाहत्याने अक्रमच्या या पोस्टवर आक्षेर्पाह कमेंट केल्यानंतर अक्रम संतापला. "तुझी पत्नी खूप हॉट दिसतेय...", चाहत्याच्या या कमेंटवर अक्रमचा पारा चढला. त्याने चाहत्याला सुनावताना म्हटले, "तुला असे म्हणणे योग्य वाटते का? मला तुझ्या पालकांना भेटायचे आहे आणि त्यांना सांगायचे आहे की त्यांनी किती मोठी चूक केली आहे."

 

टॅग्स :वसीम अक्रमपाकिस्तानट्रोलऑफ द फिल्ड