पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेभारतीयांनोपाकिस्तानचे कांदे आणि टॉमेटो खाता, मग क्रिकेटचा सामना खेळायका का नकार देता असा सवाल उपस्थित करत अकलेचे तारे तोडेले होते. त्यातच आता पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकने देखील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली आहे.
अब्दुल रज्जाक पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीला दोन महिन्यांचे 20 कोटी रुपये मिळत असल्याने तो चांगली फलंदाजी करत असल्याचा दावा केला आहे. तसेच आयपीएलची स्पर्धा होत असल्याने भारतीय संघ चांगला खेळत असल्याचे विधान अब्दुल रजाकने या मुलाखतीत केले आहे.
भारतीयांनो, पाकिस्तानचे कांदे आणि टॉमेटो खाता, मग क्रिकेटचा सामना खेळायला नकार का? शोएब अख्तरने तोडले अकलेचे तारे
भारतीय संघाचा सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागबाबत बोलताना अब्दुल रजाक म्हणाला की, वीरेंद्र सेहवागचा फुटवर्क चांगला नव्हता. मुलातनमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी वीरेंद्र सेहवागच्या तीन झेल सोडल्याने त्याला तिहेरी शतक झळकावले असल्याचा अजब दावा देखील अब्दुल रजाकने केला आहे. तसेच विरेंद्र सेहवागला स्टार फलंदाज करण्यामागे पाकिस्तानचा मोठा हात होता. आमच्या खराब क्षेत्ररक्षणामुळं सेहवाग चांगली कामगिरी करू शकला असल्याचे सांगत शोएब अख्तरनंतर आता अब्दुल रजाकने देखील आपले अकलेचे तारे तोडले आहे.
दरम्यान याआधी देखील अब्दुल रजाकने भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पाडंयाला माझ्या प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगत मी प्रशिक्षण देण्यास तयार असल्याची ऑफर दिली होती. हार्दिक पांड्याला मी खेळताना पाहिल्यानंतर मला त्याच्या खेळीत अनेक त्रृटी असल्याचे आढळून आले आहे. हार्दिकला त्याच्या फुटवर्कवर काम करण्याची गरज असल्याचे सांगत मी हार्दिकला प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचे विधान केले होते.
Web Title: Former Pakistan cricketer Abdul Razzaq says that he is batting well that Indian team captain Virat Kohli gets Rs 20 crore.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.