नवी दिल्ली : 2023 मध्ये आशिया चषक स्पर्धेचा थरार पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. अशातच मंगळवारी बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी या आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या धरतीवर होणारा पुढील आशिया चषक त्रयस्थ ठिकाणी खेळविण्याची आमची मागणी असेल. असे जय शाह यांनी म्हटले. खरं तर यापूर्वी 2008 साली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर या शेजारील राष्ट्रांमध्ये ना दौरे झाले ना कोणतील मालिका झाली. मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने शेजाऱ्यांशी संबंध तोडले. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट करताच पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर सडकून टीका केली असून नाराजी व्यक्त करत आहेत.
भारत पाकिस्तानात आला नाही तर दोन्ही देशांचे नुकसान दरम्यान, भारत-पाकिस्तानचा सामना जगात सर्वाधिक पाहिला जाणारा सामना आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये राजकारण न आणता दोन्ही देशांनी एकमेकांच्या धरतीवर क्रिकेट खेळायला हवे असे पाकिस्तानच्या संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने म्हटले. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी येत आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या संघानी पाकिस्तानात मालिका खेळली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही म्हणून आम्ही क्रिकेट खेळणे सोडून देणार नाही पण येणाऱ्या पिढीचे नुकसान होणार आहे, असे अकमलने अधिक म्हटले.
कामरान अकमलने बीसीसीआयच्या निर्णयावर म्हटले, "भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही तर आम्ही क्रिकेट खेळणे सोडून देणार नाही, पण यामुळे येणाऱ्या पिढीचे नुकसान होईल. पाकिस्तानात मोठे संघ आले आहेत. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका यांसारखे संघ पाकिस्तानात खेळले आहेत. यासाठी पीसीबीसह येथील सुरक्षा व्यवस्थेने मेहनत घेतली. आयसीसी आणि आशियाई संघटनेला पीसीबीने प्रत्युत्तर द्यायला हवं, ज्याचे अध्यक्ष जय शाह आहेत. जय शाह यांनी राजकारण करू नये ते भारतातच करावे, क्रिकेटमध्ये आणू नये".
भारत-पाकिस्तान सामन्याकडे जगाचे लक्षभारत-पाकिस्तान सामने व्हावेत असे जगाला वाटते, दोन्ही देशातील खेळाडूंमध्ये प्रेमाचे वातावरण तयार झाले आहे. तुमचे आमचे क्रिकेटर खुश आहेत, जगात भारत-पाकिस्तानपेक्षा मोठा सामना होत नाही, हा सामना जगात सगळ्यात जास्त पाहिला जातो. अलीकडेच सुनिल गावस्करांनी पाकिस्तानी खेळाडूंना मार्गदर्शन केले. वसीम अक्रम, शोएब अख्तर यांनी देखील कित्येक भारतीय खेळाडूंना आपला अनुभव सांगितला आहे. त्यामुळे या परंपरेला संपवू नका यामुळे दोन्ही देशांचे नुकसान होईल. यापुढे देखील क्रिकेट सुरूच राहणार आहे. याचा जरूर विचार करा. यामुळे क्रिकेटचे नुकसान होणार आहे. आपण एकमेकांच्या देशात खेळलो नाही तर दोन्ही देशांचे नुकसान होईल, असे कामरान अकमलने अधिक म्हटले.
2023 मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा - आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका- आयसीसी 19 वर्षांखालील मुलींची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका- आशिया चषक 2023, पाकिस्तान- आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"