Pakistan: पाकिस्तानी संघ नेदरलॅंडला पण घाबरतोय; कामरान अकमलचा संघाला घरचा आहेर 

सध्या पाकिस्तान आणि नेदरलॅंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 02:30 PM2022-08-20T14:30:24+5:302022-08-20T14:30:57+5:30

whatsapp join usJoin us
Former Pakistan cricketer Kamran Akmal said that Pakistan team is also afraid of Netherlands | Pakistan: पाकिस्तानी संघ नेदरलॅंडला पण घाबरतोय; कामरान अकमलचा संघाला घरचा आहेर 

Pakistan: पाकिस्तानी संघ नेदरलॅंडला पण घाबरतोय; कामरान अकमलचा संघाला घरचा आहेर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानचा संघ नेदरलँड दौऱ्यावर (PAK vs NED) असून तिथे एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील २ सामन्यांमध्ये विजय मिळवून पाकिस्तानने विजयी आघाडी घेतली आहे. दरम्यान, काही दिवसांतच आशिया चषकाचे (Asia Cup 2022) बिगुल वाजणार आहे. भारतीय संघ देखील झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर आहे मात्र संघातील काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी क्रिकेटमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. माजी क्रिकेटपटू कामरान अकमलने (Kamran Akmal) पाकिस्तानच्या संघ निवड समितीवर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. क्रमवारीत चौदाव्या क्रमांकावर असलेल्या संघाविरूद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ घाबरत असल्याचे त्याने म्हटले. 

पाकिस्तानच्या संघात युवा खेळाडूंना स्थान नाही
दरम्यान, पाकिस्तानी संघ नेदरलॅंड दौऱ्यावर आहे मात्र संघात कोणत्याच युवा खेळाडूला संधी दिली नसल्याने अकमल चांगलाच संतापला आहे. संघाने विजय मिळवला असता तरी एवढ्या खालच्या क्रमवारीतील संघाविरूद्ध संघर्ष करावा लागत असल्याचे त्याने सांगितले. कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी द्यायला हवी होती. युवा खेळाडूंना अशाच संघाविरूद्ध खेळवल्याने अनुभव मिळतो. तसेच आगामी आशिया चषकाच्या दृष्टीने एक चांगला गेम प्लॅन करता आला असता असे अकमलने अधिक म्हटले. नेदरलॅंडविरूद्ध पाकिस्तानची अशी अवस्था होत असेल तर भारतासारख्या मजबूत संघाविरूद्ध काय होईल अशी विचारणाही त्याने यावेळी केली, तो त्याच्या फेसबुक चॅनेलवरून संवाद साधत होता. 

पाकिस्तानची विजयी आघाडी
नेदरलॅंडविरूद्धच्या ३ सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. मात्र नेदरलॅंडचा संघ एवढा मजबूत नसताना देखील पाकिस्तानला कडवी झुंज देत असल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. त्यावरूनच कमरान अकमलने प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय संघाकडे गेम प्लॅन असल्याचे म्हणत त्याने रमीझ राजा यांच्यावरही तोफ टाकली होती. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३१६ धावांचे विशाल आव्हान दिले होते. मात्र नेदरलॅंडने कडवी झुंड दिली आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडला. अवघ्या १६ धावांनी मिळालेल्या विजयामुळे कामरान अकमलला संघ निवडसमितीवर निशाणा साधण्याची संधीच मिळाली. 

आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ - 
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर. 

 

Web Title: Former Pakistan cricketer Kamran Akmal said that Pakistan team is also afraid of Netherlands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.