Join us  

IPL 2023: "भारतीय खेळाडूंना IPL मध्ये खूप पैसा मिळतो...", पाकिस्तानी खेळाडूने व्यक्त केली खदखद

kamran akmal on ipl: भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये न खेळल्याबद्दल पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलने मोठे विधान केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 5:45 PM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय खेळाडू विदेशी लीगमध्ये खेळत नसल्याबद्दल पाकिस्तानी क्रिकेटर कामरान अकमलने मोठे विधान केले आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड भारतीय खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळून देत नाही यातून शिकण्यासारखे आहे असे कामरान अकमलने म्हटले आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यातून शिकावे आणि तेच करावे आणि आपल्या खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळू देऊ नये. असेही पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने म्हटले. 

दरम्यान, भारताच्या कोणत्याही खेळाडूला आयपीएल व्यतिरिक्त जगातील इतर कोणत्याही विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. जर खेळाडूने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली तरच तो बाहेर जाऊन खेळू शकतो. मात्र, इतर देशातील खेळाडू जगभरातील विविध लीगमध्ये जाऊन खेळू शकतात. 

PCBने BCCIकडून शिकायला हवे - अकमलकामरान अकमलला एका कार्यक्रमादरम्यान भारतीय खेळाडूंनी पीएसएलमध्ये खेळायला हवे का, असे विचारले असता त्याने म्हटले, "नाही, भारतीय खेळाडूंनी पीएसएलमध्ये खेळू नये. भारतीय बोर्ड आपल्या खेळाडूंना विदेशी ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळू देत नाही हे उत्तम काम करत आहे. त्यांना माहित आहे की आयपीएल दोन महिने चालते आणि त्यानंतर बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाते. खेळाडू आर्थिकदृष्ट्या इतके मजबूत आहेत की त्यांना इतर कोणत्याही लीगमध्ये जाऊन खेळण्याची गरज नाही. खेळाडूंची कारकीर्द कशी पुढे न्यावी, हे आपल्या बोर्डालाही यातून शिकता येईल. त्यांच्याकडे 14 ते 15 खेळाडू आहेत ज्यांनी 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. एकिकडे असे असताना आमच्याकडे असे फक्त दोन ते तीन खेळाडू आहेत ज्यांनी 100 कसोटी सामने खेळले आहेत. भारत आपल्या खेळाडूंचा आणि क्रिकेटचा आदर करतो. त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमधून भरपूर पैसा मिळतो. आयपीएलसमोर बीबीएल काहीच नाही. जगातील कोणतीही लीग आयपीएलशी स्पर्धा करू शकत नाही." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआयपाकिस्तानबिग बॅश लीगटी-20 क्रिकेट
Open in App