आशिया चषक २०२२ स्पर्धेतील निराशाजन कामगिरी विसरून भारतीय संघ आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतासाठी काही सकारात्मक गोष्टीही घडल्या. विराट कोहलीचा ( Virat Kohli) परतलेला फॉर्म ही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अर्शदीप सिंगच्या रुपाने चांगला डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज मिळाला, हार्दिक पांड्याला फॉर्म कायम राखण्याची पुरेशी संधी मिळाली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी BCCI ने भारतीय संघ जाहीर केला आहे आणि त्यांचा आणखी सराव व्हावा यासाठी ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-३ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) याने भारतीय संघातील दिग्गज खेळाडूला निवृत्तीसाठीचा सल्ला दिला आहे.
Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे देशप्रेम! भारतासाठी लाखो रुपयांवर पाणी सोडणार, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आशिया चषक स्पर्धेपूर्वी विराटचा फॉर्म हा सर्वांच्या चिंतेचा विषय बनला होता. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनीही विराटच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. पण, कोहलीने फॉर्म मिळवताना २७६ धावांसह आशिया चषक २०२२मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध सुपर ४ मधील सामन्यात ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. ६१ चेंडूंत १२२ धावा करत त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पहिले शतक झळकावले. याच विराटला पाकिस्तानच्या आफ्रिदीने संघातून हकालपट्टी होईपर्यंत खेळत राहू नकोस असा सल्ला दिला आहे.
Samma Tv कडे बोलताना तो म्हणाला, "विराट ज्या प्रकारे खेळला, त्याच्या कारकिर्दीची सुरुवात, त्याने स्वतःचे नाव कमावण्याआधी सुरुवातीला संघर्ष करावा लागला. तो एक चॅम्पियन आहे. प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास निवृत्तीकडे सरकत असतो, पण या काळात तुम्ही तुमचा खेळाचा दर्जा उंचावलेला असायला हवा. त्यामुळे जेव्हा तुम्ही चांगल्या फॉर्मात असता तेव्हाच निवृत्ती घेतलेली बरी. संघातून हकालपट्टी होईपर्यंत वाट बघण्याची गरज नाही. असे क्वचितच घडते. फार कमी खेळाडू, विशेषत: आशियाई क्रिकेटपटू हा निर्णय घेतात. पण, विराट जेव्हा निवृत्ती घेईल, तेव्हा त्याच्या स्टाईलमध्येच ती झाली पाहिजे. जशी त्याच्या कारकीर्दिची सुरुवात झाली होती.''
विराटने १०२ कसोटींत ८०७४ धावा केल्या आहेत आणि त्यात २७ शतकं व २८ अर्धशतकांचा समावेश आहे. २६२ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ५७.६८च्या सरासरीने १२३४४ धावा आहेत. त्यात ४३ शतकं व ६४ अर्धशतकांचा समावेश आहे. १०४ ट्वेंटी-२०त त्याने ५१.९४ च्या सरासरीने ३५८४ धावा करताना १ शतक व ३२ अर्धशतकं झळकावली आहेत. रोहित शर्मानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३५००+ धावा करणारा तो दुसरा खेळाडू आहे. रॉस टेलर याच्यानंतर तीनही फॉरमॅटमध्ये १००+ सामने खेळण्याचा विक्रम विराटनेच केला आहे.
Web Title: Former Pakistan cricketer Shahid Afridi shares retirement advice for Virat Kohli and suggested that he should call it quits before he is dropped from the team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.