पाकिस्तानच माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानं सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. त्यानं लिहिलं की,''गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली होती. माझे शरीर प्रचंड दुखत होते. त्यानंतर मी वैद्यकिय चाचणी केली आणि त्यात कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मला आता तुमच्या प्रार्थनांची गरज आहे.''
अखेरचा गोल!, फुटबॉलपटूचे शव घेऊन सहकारी पोहोचले मैदानावर; Video पाहून आवरणार नाहीत अश्रू
कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आफ्रिदी अनेक गरजूंना सातत्यानं मदत करत आहे. त्यानं शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाकिस्तानातील अनेक भागांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले. या कालावधीत तो अनेक लोकांना भेटला आणि त्यामुळेच त्याला कोरोना झाल्याची चर्चा सुरू आहे. आफ्रिदीनं बांगलादेशचा खेळाडू मुश्फिकर रहीम यालाही मदत केली. रहीमनं बांगलादेशमधील लोकांच्या मदतीसाठी त्याच्या द्विशतकाची बॅट लिलावासाठी ठेवली होती आणि आफ्रिदीनं ती खरेदी केली. .
यापूर्वी, पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर यालाही कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानं कोरोनावर मात केली आहे. उमरनं 2001मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले होते. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर तो 14 दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये गेला होता आणि त्यानंतर आलेला त्याचा वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर उमरनं लोकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
38 वर्षीय खेळाडूनं कोरोनाची लागण झाल्याचे समजताच योग्य ती काळजी घेतली. त्यानंतर त्यानं सांगितले की,''दोन आठवड्याच्या आयसोलेशन नंतर माझा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अल्लाहमुळ मी तंदुरुस्त झालो आहे. या संकटकाळात प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्यायला हवी. आपल्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाय आणि योग्य पाऊलं उचलायला हवी.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
भारतीय क्रिकेट वाटचालीचा साक्षीदार हरपला; माजी खेळाडूनं झोपेतच घेतला अखेरचा श्वास
अम्फान वादळ: दहा हजार कुटुंबीयांच्या मदतीसाठी सौरव गांगुली रस्त्यावर!
ऑस्ट्रेलियातील रस्त्यांवर झळकतायत कोहली, तेंडुलकर यांच्या नावाचे फलक; जाणून घ्या कारण
जादू की भूत? आकाश चोप्रानं शेअर केला भयावह Video; तुम्हालाही बसेल धक्का
आलिशान रिसॉर्टचा मालक आहे 'हा' क्रिकेटपटू; एका दिवसासाठी मोजावे लागतात 88 हजार !
Read in English
Web Title: Former Pakistan Cricketer Shahid Afridi Tests Positive for Coronavirus
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.