नवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर 'गजवा-ए-हिंद'ची स्वप्नं पाहत आहे. आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर हल्ला करू, असं विधान अख्तरनं केलं आहे. समा टीव्हीशी बोलताना त्यानं हे वक्तव्य केलं. अख्तरचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भारताविरोधात गरळ ओकणारा अख्तर हा पहिला क्रिकेटपटू नाही. याआधी शाहिद आफ्रिदी, जावेद मियांदाद यांच्यासारख्या क्रिकेटपटूंनीदेखील भारताविरोधात वादग्रस्त विधानं केली आहेत.समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शोएब 'गजवा-ए-हिंद'बद्दल बोलताना दिसत आहे. 'गजवा-ए-हिंद'चा अर्थ 'भारताविरोधात पवित्र युद्ध' असा होतो. 'आमच्या पवित्र पुस्तकात 'गजवा-ए-हिंद'चा उल्लेख आहे. नदी दोनदा रक्तानं लाल होईल. अफगाणिस्तानहून सेना अटॉकपर्यंत पोहोचेल. उझबेकिस्तानहून विविध तुकड्या पोहोचतील. हा सगळा भाग ऐतिहासिक क्षेत्र खोरासनशी संबंधित असून तो लाहोरपर्यंत पसरला आहे,' असं अख्तरनं मुलाखतीत म्हटलं आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- VIDEO: आधी काश्मीर ताब्यात घेऊ, मग भारतावर हल्ला करू; शोएब अख्तरचं वादग्रस्त विधान
VIDEO: आधी काश्मीर ताब्यात घेऊ, मग भारतावर हल्ला करू; शोएब अख्तरचं वादग्रस्त विधान
पाकिस्तानच्या माजी बॉलरची 'गजवा-ए-हिंद'साठी बॅटिंग
By कुणाल गवाणकर | Published: December 25, 2020 10:27 AM