Join us  

भारतीय खेळाडू स्वार्थी, पाकिस्तानला IPL मध्ये नो एन्ट्री हे दुर्दैव; मोहम्मद हाफीज बरळला

पाकिस्तान क्रिकेट संघ खराब कामगिरीमुळे चाहत्यांसह माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 12:33 PM

Open in App

Mohamad Hafiz News : पाकिस्तान क्रिकेट संघ खराब कामगिरीमुळे चाहत्यांसह माजी खेळाडूंच्या निशाण्यावर आहे. शेजाऱ्यांना ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या साखळी फेरीत अमेरिकेसारख्या नवख्या संघाने पराभवाची धूळ चारली. मग त्यानंतर भारताने पराभव करून त्यांच्या तोंडचा घास पळवला. अखेर आयर्लंड आणि अमिरेका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला अन् पाकिस्तान वाहून गेला. आता पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद हाफीजने पाकिस्तानी संघावर टीका करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याशिवाय त्याने आयपीएल आणि वन डे विश्वचषकातील विराट कोहलीच्या एका शतकाचा दाखला देत त्याच्यावर टीकास्त्र सोडले. हाफीज 'क्लब प्रेरी फायर' या शोमध्ये बोलत होता. 

मोहम्मद हाफीजने भारतीय संघावर टीका करताना आपल्या संघाला देखील घरचा आहेर दिला. तो म्हणाला की, आम्ही ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका खेळत होतो. तेव्हा सामना सुरू असताना पाकिस्तानचे ४-५ खेळाडू ड्रेसिंगरूममध्ये झोपले होते. मी पाहताच त्यांच्यावर दोन महिन्यांची बंदी घातली. कारण की, मला संघात बदल हवा होता आणि खेळाडूंना आपण ज्या स्तरावर आहोत त्याचे महत्त्व समजले पाहिजे. 

तसेच पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळवले जात नाही हे खूप दुर्दैवी आहे. आम्ही आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात खेळलो आहोत. पण त्यानंतर आम्हाला कधी बोलावलेच नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका व्हायला हवी. यापेक्षा मोठा क्रिकेट सामना कुठेच नाही. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने आयपीएलबद्दल केलेले विधान चुकीचे आहे. आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला कशी मदत होईल मला समजत नाही. आयपीएलमध्ये खेळण्यापेक्षा, तेथील करार कायम राहील यासाठी झटण्यापेक्षा... देशासाठी खेळणे ही अभिमानाची बाब आहे, असेही हाफीजने म्हटले.

विराटवर टीकास्त्र विराट कोहलीबद्दल त्याने सांगितले की, वन डे विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध लोकेश राहुलने चांगली खेळी केली. त्याने सामना जिंकवला पण शतक न झाल्याने तो निराश दिसला. यावरूनच कळते की भारतीय खेळाडू स्वार्थी आहेत. असेच काहीसे विराट कोहलीच्या बाबतीत आहे. याच स्पर्धेत विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झळकावलेले शतक म्हणजे स्वार्थी खेळाडूचे एक उदाहरण आहे. मी तेव्हा देखील हेच बोललो होतो आणि आजही यावर ठाम आहे. तो केवळ वैयक्तिक विक्रमांसाठी खेळत असतो.

टॅग्स :मोहम्मद हाफीजभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२४विराट कोहलीभारत विरुद्ध पाकिस्तान