LLC 2023: "तुम्ही भूतकाळात राहिल्यास...", 'कट्टर वैरी' शाहिद आफ्रिदीने गंभीरचे केले खास कौतुक 

Gautam Gambhir and Shahid Afridi : सध्या कतारच्या धरतीवर लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 06:16 PM2023-03-17T18:16:13+5:302023-03-17T18:16:43+5:30

whatsapp join usJoin us
Former Pakistan player Shahid Afridi, who is playing in legends league cricket 2023, has praised former India opener Gautam Gambhir  | LLC 2023: "तुम्ही भूतकाळात राहिल्यास...", 'कट्टर वैरी' शाहिद आफ्रिदीने गंभीरचे केले खास कौतुक 

LLC 2023: "तुम्ही भूतकाळात राहिल्यास...", 'कट्टर वैरी' शाहिद आफ्रिदीने गंभीरचे केले खास कौतुक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

legends league cricket 2023 । कतार : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Gautam Ghambhir Vs Shahid Afridi) हे मैदानावरील 'कट्टर वैरी' आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही या दोघांमध्ये अनेक चर्चासत्रांमध्ये शाब्दिक वाद झालेले पाहायला मिळाले आहेत. पण, दोघेही पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर आले आहेत. खरं तर कतारच्या धरतीवर सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटची स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत जगभरातील निवृत्त खेळाडू सहभागी झाले आहेत.

दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व करत आहे, तर शाहिद आफ्रिदीच्या खांद्यावर आशिया लायन्सच्या संघाची धुरा आहे. गंभीर आणि आफ्रिदी यांचे संघ या आधी भिडले होते तेव्हा इंडिया महाराजाच्या संघाने बाजी मारली होती. त्या सामन्यातील नाणेफेकीदरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गंभीर आफ्रिदीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. 

गौतम गंभीरबद्दल प्रश्न विचारला असता शाहिद आफ्रिदीने म्हटले, "आम्ही दोघेही आपापल्या देशांचे राजदूत आहोत. तुम्ही भूतकाळात राहिल्यास, तुम्ही जगू शकणार नाही. आपण आपल्या वर्तमानाचा आनंद घेत आहोत. गंभीर त्याच्या संघाचे नेतृत्व करत आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तो सुंदर खेळत आहे आणि त्याला फलंदाजी करताना पाहण्यात मजा येते. मी त्याच्याबरोबर दोन ते तीन दिवस घालवले आहेत आणि ते खूपच चांगले होते." तसेच लीजेंड्स लीग क्रिकेटच्या पुढील हंगामात सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, वसिम अक्रम आणि वकार युनूस यांसारख्या खेळाडूंनी देखील सहभागी व्हावे असे आफ्रिदीने अधिक सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 
 

Web Title: Former Pakistan player Shahid Afridi, who is playing in legends league cricket 2023, has praised former India opener Gautam Gambhir 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.