Shahid Afridi bats for the Taliban in Afghanistan : अफगाणिस्तानातून अमेरिकन सैनिकांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा तालिबान्यांच्या हालचाली सुरू केल्या, अन् पाहता पाहता संपूर्ण अफगाणिस्तानावर त्यांनी कब्जा करून सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यांच्याविरोधात स्थानिकांनी आंदोलनं केली, परंतु त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. असे प्रकार दिवसेंदिवस घडताना दिसत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानचा गोलंदाज राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी सोशल मीडियावरून निषेध नोंदवला, परंतु पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचं ( Shahid Afridi) म्हणणं काही वेगळं आहे. त्याला तालिबान्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन दिसला आहे. ( Shahid Afridi makes shocking claim, says THIS in support of Taliban regime)
शाहिद आफ्रिदी आणि वाद हे एका नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता अफगाणिस्तानावर शस्त्राच्या सहाय्यानं ताबा मिळवणाऱ्या तालिबान्यांमध्ये शाहिद आफ्रिदीला सराकात्मकता दिसली. त्यानं केलेलं विधान हे राशिद खान व मोहम्मद नबी यांच्यासारख्या अफगाणी क्रिकेटपटूंना धक्का देणारं व बोचरं आहे. आफ्रिदीनं तालिबान्यांचे कौतुक केलं आणि या चक्करमध्ये बरंच काही वादग्रस्त बोलून गेला.
तो म्हणाला,''तालिबान यावेळी सकारात्मक दृष्टीकोन घेऊन आले आहेत. त्यांनी येथील महिलांना काम करण्याची व राजकारणात सहभाग घेण्याची परवानगी दिली आहे. या गोष्टी आधी पाहायला मिळाल्या नाहीत. तालिबानी क्रिकेटलाही पाठिंबा देत आहेत. श्रीलंकेतील परिस्थितीमुळे मालिका होऊ शकली नाही, परंतु तालिबानी क्रिकेटला संपूर्ण पाठिंबा देत आहेत.''