पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर यानं कोरोनावर मात केली आहे. उमरनं 2001मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले होते. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर तो 14 दिवसांसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये गेला होता आणि त्यानंतर आलेला त्याचा वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर उमरनं लोकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
38 वर्षीय खेळाडूनं कोरोनाची लागण झाल्याचे समजताच योग्य ती काळजी घेतली. त्यानंतर त्यानं सांगितले की,''दोन आठवड्याच्या आयसोलेशन नंतर माझा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अल्लाहमुळ मी तंदुरुस्त झालो आहे. या संकटकाळात प्रत्येकानं स्वतःची काळजी घ्यायला हवी. आपल्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाय आणि योग्य पाऊलं उचलायला हवी.''
2014मध्ये उमरने अखेरचे पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानं पदार्पणाच्या सामन्यातं 163 चेंडूंत 104 धावांची खेळी केली होती. पण, त्यानंतर त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानं 22 वन डे आणि 44 कसोटी संघात पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2016मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2011मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध 236 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोट्यधीश नेयमारचा अवघ्या ९ हजारांच्या सरकारी निधीसाठी अर्ज?... जाणून घ्या सत्य
आपला गडी मागे राहिला; विराट कोहलीला 'या' हॉट मॉडल्सनी टाकलं पिछाडीवर!
Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!
वसीम अक्रमच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला शेवटचं स्थान!
चला निसर्ग जगवूया, मनाची बंद कवाडं उघडूया; रोहित शर्माची भावनिक साद
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सर्वोत्तम वन डे संघातून रोहित शर्माला वगळले!