आफ्रिदीची 'नवीन' वादात उडी! पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं अफगाणिस्तानच्या खेळाडूचं केलं समर्थन

naveen-ul-haq ipl 2023 : आयपीएलमध्ये लखनौ विरूद्ध आरसीबी हा सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 01:57 PM2023-05-03T13:57:24+5:302023-05-03T13:57:46+5:30

whatsapp join usJoin us
Former pakistani player shahid afridi has supported afghanistan player after the altercation between virat kohli and naveen-ul-haq in rcb vs lsg match in ipl 2023 | आफ्रिदीची 'नवीन' वादात उडी! पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं अफगाणिस्तानच्या खेळाडूचं केलं समर्थन

आफ्रिदीची 'नवीन' वादात उडी! पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं अफगाणिस्तानच्या खेळाडूचं केलं समर्थन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli vs naveen-ul-haq। मुंबई : आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक हे या वादात केंद्रस्थानी होते. अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन हा फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजची गोलंदाजी सुरू होती. तेव्हा विराट आणि त्याच्यात काहीतरी बिनसल्याचे पाहायला मिळाले. सामना संपल्यानंतर या वादाला वेगळे वळण लागले. नंतर लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने मध्यस्थी करून नवीन आणि कोहली यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण अफगाणी खेळाडूने विराटला भेटण्यास नकार दिला. दरम्यान, या वादावर अनेक माजी खेळाडू व्यक्त होत असताना पाकिस्तानी संघाच्या माजी खेळाडूने नवीन-उल-हकचे समर्थन केले आहे.

खरं तर जेव्हा विराट आणि सिराज नवीनच्या बॅटिंगवेळी त्याच्याशी बोलत होते तेव्हा अमित मिश्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण कोहली थांबला नाही आणि सतत काहीतरी सांगत राहिला. सामना संपल्यानंतर जेव्हा कोहली आणि नवीन समोर आले तेव्हा सुरुवातीला दोघांनी हस्तांदोलन केले. पण इथेही दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर नवीनने कोहलीचा हात झटकला.

आफ्रिदीची 'नवीन' वादात उडी
स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना शाहिद आफ्रिदीने नवीनच्या कृत्याचे समर्थन केले. "नवीन तेव्हाच प्रतिक्रिया देतो जेव्हा कोणी त्याला विनाकारण डिवचतो. मी त्याला अनेकदा गोलंदाजी करताना पाहिले आहे, त्याला फटकारले देखील जाते, पण त्याने कधीही कोणाशी भांडण करण्याचा प्रयत्न केला नाही. मी त्याला इतका आक्रमक कधी पाहिला असेल तर मला आठवत नाही", असे आफ्रिदीने म्हटले आहे. तसेच प्रत्येक संघात आक्रमक खेळाडूंचा साठा असतो. आमच्या बाबतीत देखील तेच बोलले जाते. ही सामान्य गोष्ट असून वेगवान गोलंदाज तापट स्वभावाचे असतात, अशा शब्दांत शाहिदी आफ्रिदीने नवीन-उल-हकच्या कृतीचे समर्थन केले. 

नवीन-उल-हक अन् वाद 
नवीन-उल-हक त्याच्या तापट स्वभावासाठीही ओळखला जातो. लंका प्रीमियर लीगदरम्यान पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर आणि शाहिद आफ्रिदीसोबतही त्याचा वाद झाला होता. त्याच्या स्वभावाबद्दल नवीनने एकदा एका कार्यक्रमात म्हटले होते, "जर कोणी माझ्याकडे येऊन काही बोलले तर मी मागे हटणार नाही. मी लहानपणापासून असाच आहे. असा माझा स्वभाव आहे. उद्यापासून मी बदलेन असे म्हणत असेल तर मी खरे बोलत नसेन. मला कोणी काही बोलावे आणि मी माघार घेतो असे मी म्हटले तर ते कधीच होऊ शकत नाही. कारण आक्रमकता माझ्या शरीरात आहे, ती माझ्या डीएनएमध्ये आहे."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Former pakistani player shahid afridi has supported afghanistan player after the altercation between virat kohli and naveen-ul-haq in rcb vs lsg match in ipl 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.