Join us  

पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका

सध्या आयर्लंड आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 12:45 PM

Open in App

IRE vs PAK T20 Series : पाकिस्तान क्रिकेट संघ आयर्लंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत असल्याने आपल्याच देशाचे नाव कमी होत असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा माजी अध्यक्ष रमीझ राजाने म्हटले आहे. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यजमान आयर्लंडने पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिल्यानंतर दुसरा सामना जिंकून पाकिस्तानने मालिकेत बरोबरी साधली. आयर्लंड क्रिकेट चांगल्या सुविधा देत नसल्याचा आरोप यावेळी रमीझ राजाने केला. 

आयर्लंड क्रिकेटच्या नियोजनावरून रमीझ राजाने त्यांच्यावर सडकून टीका केली. तो म्हणाला की, आयर्लंड आणि पाकिस्तान या मालिकेचे कव्हरेज अत्यंत वाईट आहे. एखाद्या क्लब क्रिकेटचा सामना सुरू असल्याचे वाटते. केवळ दोन कॅमेरे आहेत, डीआरएसची कमतरता आहे. फलंदाजांनी मारलेला फटका देखील अनुभवता येत नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत नाही. आयर्लंडविरूद्ध खेळून पाकिस्तान स्वत:चेच नुकसान करून घेत आहे. रमीझ राजा त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलत होता.

रमीझ राजाची टीका तसेच पाकिस्तान क्रिकेटचे जगभर चाहते आहेत, अनेकांना हे आवडते. जगभरात आमच्या क्रिकेटचा धाक आहे. पण, जगासमोर आपण अशा स्थितीत खेळतोय... यामुळे पाकिस्तान क्रिकेटला कमी लेखले जात आहे. या पद्धतीच्या कव्हरेजमुळे आमच्या क्रिकेटला खाली खेचले जात आहे, असेही राजाने सांगितले. 

दरम्यान, २ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. पाकिस्तान आणि आयर्लंड हे दोन्हीही संघ एकाच गटात आहेत. आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्हीही संघांसाठी महत्त्वाची आहे. किंबहुना ही मालिका म्हणजे विश्वचषकाची तयारी असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. 

टॅग्स :आयर्लंडपाकिस्तानटी-20 क्रिकेट