"नो-हिट शर्मा, त्यानं आता माघार घ्यावी", गावस्करांसह माजी खेळाडूची रोहितवर बोचरी टीका

sunil gavaskar on rohit sharma : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 02:43 PM2023-05-07T14:43:53+5:302023-05-07T14:44:48+5:30

whatsapp join usJoin us
Former player Sunil Gavaskar has said that Mumbai Indians captain Rohit Sharma should take a break now, while K Srikkanth has criticized that Rohit should be called No hit Sharma  | "नो-हिट शर्मा, त्यानं आता माघार घ्यावी", गावस्करांसह माजी खेळाडूची रोहितवर बोचरी टीका

"नो-हिट शर्मा, त्यानं आता माघार घ्यावी", गावस्करांसह माजी खेळाडूची रोहितवर बोचरी टीका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

rohit sharma ipl । नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर आणि कृष्णमाचारी श्रीकांत यांनी रोहित शर्मावर बोचरी टीका केली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल सामना पार पडला. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा खाते न उघडता तंबूत परतला. रोहित स्कूप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात दीपक चाहरचा शिकार झाला. रोहितच्या या शॉट सिलेक्शनवरून गावस्करांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर कृष्णमाचारी यांनी रोहितचा नो-हिट शर्मा असा उल्लेख केला आहे. 

फॉर्ममध्ये नसलेल्या रोहित शर्माने स्कूप शॉट खेळणे चुकीचे असल्याचे गावस्करांनी म्हटले आहे. याशिवाय रोहितला मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमधून काढायला हवे, असे कृष्णमाचारी श्रीकांत यांनी म्हटले आहे. रोहितने कालच्या सामन्यातून एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिकवेळा (१६) शून्यावर बाद होणारा खेळाडू रोहित ठरला आहे. 

रोहितने थोडा ब्रेक घ्यावा - गावस्कर 
"रोहित कालच्या सामन्यात होता असे जाणवले देखील नाही. मी पूर्णपणे चुकीचा असू शकतो, पण त्याने खेळलेला स्कूप शॉट कर्णधाराचा शॉट नव्हता", असे गावस्करांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले. तसेच संघ अडचणीत आहे हे जाणून कर्णधार डाव सांभाळत असतो. पॉवरप्लेमध्ये दोन बळी गेले होते. रोहितने फॉर्ममध्ये नसताना देखील असा शॉट खेळणे चुकीचे आहे. त्यामुळे कदाचित रोहितने आताच्या घडीला थोडा ब्रेक घ्यावा, हे त्याच्यासाठी चांगलेच असेल, असे गावस्करांनी अधिक सांगितले.   

 कृष्णमाचारी यांची बोचरी टीका
भारतीय संघाचे माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांनी रोहितवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी म्हटले, "तो नो-हिट शर्मा आहे, रोहित शर्माने त्याचे नाव बदलून 'नो-हिट शर्मा' असे ठेवावे, मी एमआयचा कर्णधार असतो तर त्याला इलेव्हनमध्ये खेळवले नसते." खरं तर या हंगामात रोहितने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये १२९.५८ च्या स्ट्राईक रेटने १८४ धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक झळकावले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Former player Sunil Gavaskar has said that Mumbai Indians captain Rohit Sharma should take a break now, while K Srikkanth has criticized that Rohit should be called No hit Sharma 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.