क्रिकेटच्या मैदानात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगत असते. आता मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा हे प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्यासाठी दोन्हीही देशातील चाहते आतुर आहेत. आशिया चषकात २ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेला आता एक महिन्याहून कमी कालावाधी उरला आहे. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनूसने टीम इंडियाला इशारा दिला आहे.
पाकिस्तानी संघात आता बदल झाला असून पहिल्या संघाच्या तुलनेत विद्यमान संघ अधिक मजबूत असल्याचे युनूसने म्हटले आहे. क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना त्याने म्हटले, "२०२१ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव करत टीम इंडियाचा आमच्याविरूद्धचा विजयरथ रोखला. यावेळीही पाकिस्तानचा संघ भारताला हरवू शकतो. कारण भारतीय संघापेक्षा आमच्या संघात अधिक मॅचविनर्स आहेत."
"तरीही विश्वचषकात भारताविरुद्ध हरायचो"तसेच आमच्या काळात आत्ताच्या तुलनेत दबाव हा मोठा चिंतेचा विषय नव्हता. ज्या संघाविरूद्ध तुम्ही कमी खेळता तितका दबाव वाढत असतो. खासकरून जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असेल तर दबाव तिप्पट असतो. कदाचित आमच्या काळात ते तुलनेने कमी होते कारण आम्ही आमच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांविरूद्ध भरपूर क्रिकेट खेळायचो. पण, तरीही विश्वचषकात भारताविरुद्ध हरायचो. पण, आजकाल खेळाडू नक्कीच दबाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळत आहेत, असेही त्याने सांगितले.
...तर भारताचा पराभव निश्चित - युनूसवकास युनूसने आणखी सांगितले की, पाकिस्तानी संघात अनेक मॅच विनर खेळाडू आहेत. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि सलामीवीर फखर झमान हे स्वबळावर सामना जिंकवू शकतात. तसेच त्यांचा भारतासोबत चांगला रेकॉर्ड आहे. शाहीन-फखर चमत्कार करू शकतात. इमामलाही आपण शानदार खेळी करताना पाहिले आहे. फक्त दबाव हाताळण्यात त्यांना यश आले तर ते नक्कीच भारताचा पराभव करतील.
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल