इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये एकेकाळी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाचा भाग असलेल्या आंध्रप्रदेशच्या खेळाडूला अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशकडून रणजी खेळलेल्या नागराजू बुडुमुरूने ने तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान (आयटी) मंत्री के. टी. रामाराव यांचे खाजगी सचिव सांगून ६० कंपन्यांची फसवणूक केली असून पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याने ३ कोटींची हेराफेरी केली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, २८ वर्षीय नागराजू बुडुमुरूने शहरातील एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात बोलावले. रिकी भुईचा प्रतिनिधी म्हणून आणि आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक म्हणून दाखवून, त्याला प्रायोजित करण्याचे वचन दिले. एवढेच नाही तर कंपनीतील लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने नॅशनल क्रिकेट अकादमी आणि असोसिएशनची बनावट कागदपत्रे बनवली. अशाप्रकारे कंपनीने १२ लाख रुपये बोर्डाला दिल्यानंतरही उत्तर न मिळाल्याने हे प्रकरण समोर आले.
या घटनेची माहिती देताना सायबर क्राइमचे डीसीपी डॉ. बालसिंग राजपूत यांनी हिंदुस्थान टाइमशी बोलताना सांगितले की, या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर आम्ही त्या पैशांचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. मनी ट्रेलने नागराजूकडे लक्ष वेधले आणि आम्ही या आठवड्याच्या सुरुवातीला त्याचा आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील यावरीपेट्टा येथे शोध घेतला. तेथून अटक केली. तेथून आम्ही आरोपींकडून सुमारे 7.6 लाख रुपये जप्त केले आहेत.
नागराजूने एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आणि 2014 ते 2016 या कालावधीत आंध्र प्रदेशच्या रणजी संघाचाही भाग होता. क्रिकेटच्या काळात त्याला आलिशान जीवनशैली जगण्याचे व्यसन लागले. पण 2018 सालानंतर जेव्हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला वेग आला नाही तेव्हा त्याने फसवणुकीचा मार्ग निवडला. 2018 ते 2020 पर्यंत नागराजूवर 10 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर त्याच्यावर आणखी 9 खटले सुरू आहेत. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचाही एक भाग होता पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Former Ranji cricketer & SRH Player Nagraju Budumuru Arrested For Impersonating Andhra Pradesh CM And Rs 3 Crore Fraud
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.