IPLचा आवडता संघ कोणता? पत्नीच्या उत्तरानं डिव्हिलियर्सही झाला शॉक; अभिनेत्यासाठी बदलली टीम

Danielle De Villiers supporting KKR due to Shahrukh Khan : सध्या आयपीएलच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 07:30 PM2023-04-06T19:30:44+5:302023-04-06T19:31:20+5:30

whatsapp join usJoin us
Former RCB player AB de Villiers wife Danielle De Villiers supporting KKR due to Shahrukh Khan | IPLचा आवडता संघ कोणता? पत्नीच्या उत्तरानं डिव्हिलियर्सही झाला शॉक; अभिनेत्यासाठी बदलली टीम

IPLचा आवडता संघ कोणता? पत्नीच्या उत्तरानं डिव्हिलियर्सही झाला शॉक; अभिनेत्यासाठी बदलली टीम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ab de villiers ipl । नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे. जवळपास सर्वच संघानी आपला पहिला सामना खेळला आहे. नेहमीप्रमाणे यंदा देखील आयपीएलमध्ये चुरशीच्या लढती पार पडत आहेत. कागदावर सर्वात तगडा वाटणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मुंबई इंडियन्सला पराभूत करून विजयी सलामी दिली आहे. आरसीबीचा माजी खेळाडू आणि त्याची पत्नी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये डिव्हिलियर्सच्या पत्नीच्या उत्तराने खुद्द मिस्टर ३६० देखील चक्रावून गेला.

IPL मधील आवडता संघ कोणता?
या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, डिव्हिलियर्स आणि त्याच्या पत्नीला काही प्रश्न विचारले जातात. दोघेही विचारलेल्या प्रश्नांची फटाफट उत्तरे देत आहेत. अशातच आयपीएलमधील आवडता संघ कोणता असे विचारले असता, मिस्टर ३६० ने क्षणाचा देखील विलंब न करता रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरूचे नाव घेतले. पण डिव्हिलियर्सच्या पत्नीने कोलकाता नाईट रायडर्स आवडता संघ असल्याचे म्हटले. लक्षणीय बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानमुळे केकेआरचा संघ फेव्हरेट असल्याचे डिव्हिलियर्सच्या पत्नीने सांगितले. खरं तर शाहरूख खान कोलकाताच्या संघाचा मालक आहे.

RCBची विजयी सलामी
मुंबई इंडियन्सविरूद्धचा सामना जिंकून आरसीबीने विजयी सलामी दिली आहे. मुंबईला १७१ धावांवर रोखल्यानंतर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने अप्रतिम कामगिरी करून विजय साकारला. विराटने ४६ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला. तर कर्णधार डू प्लेसिस ४३ चेंडूत ७३ धावा करून कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. अखेर आरसीबीने १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि ८ गडी आणि २२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Former RCB player AB de Villiers wife Danielle De Villiers supporting KKR due to Shahrukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.