विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाचा माजी खेळाडू विकास टोकस ( Vikas Tokas) याला दिल्ली पोलिसांतील एका अधिकाऱ्यानं जोरात मुक्का मारला. त्यात खेळाडूचा डोळा थोडक्यात वाचला. पण, या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांची बाजू मांडली आहे. दक्षिण-पश्चिम जिल्ह्याचे DCP गौरव शर्मा यांच्या म्हणण्यानुसार विकास टोकसनेच पोलिसांसोबत गैरवर्तवणुक केली. त्यात अनावधानानं त्याच्या डोळ्याजवळ मार लागला.
विकास टोकसनं याबाबत पोलीस मुख्यालयात मेल द्वारे तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यानं पोलिसांनी त्याच्यासोबत गैरवर्तवणुक केली आणि २६ तारखेला घडलेल्या या घटनेत एका पोलिसानं त्याला मुक्का मारला. त्यात तो आंधळा होता होता वाचला, असे लिहिले आहे. त्यानं या मेलसोबत डोळ्याखाली जखम दिसत असलेला फोटोही पाठला आहे. त्यानं त्या पोलीस अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणई केली आहे. या प्रसंगानंतर मानसिक दडपणाखाली गेल्याचेही त्यानं नमुद केले.
विकास टोकसनं १५ प्रथम श्रेणी व ७ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. २०१६मध्ये तो RCB संघाचा सदस्य होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पोलीस मुख्यालयानं या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांनी विकासचा जाब नोंदवला आहे.
नेमकं काय झालं?
प्रजासत्ताक दिनी चेकिंग करताना रात्री ११,३० वाजता मोहम्मदपुर येथे राहणआऱ्या विकास टोकस नामक व्यक्तिला तपासासाठी रोखण्यात आले. विकासनं यावेळी सहकार्य करण्याएवजी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी राष्ट्रीय खेळाडू आहे आणि मागील १० वर्ष रणजी करंडक स्पर्धेत खेळतोय, असे तो पोलिसांना सांगत होता. यावेळी पोलिसांनी त्याला सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालत्यानं दम भरला. तेव्हा विकासनं पुन्हा पोलिसांसोबत गैरवर्तवणुक सुरू केली. त्याला पोलीस ठाण्यास येण्यास सांगितले, तेव्हा तो कारमधून दुसऱ्या मार्गावर जाण्यास निघाला. तेव्हा पोलिसांनी त्याला रोखले आणि तेव्हा झालेल्या झटापटीत त्याच्या डोळ्यावर मार लागला, असे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Former RCB Player Vikas Tokas Accuses Delhi Police Of Assault, Cops Deny Allegations
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.