Join us  

Why Virat Kohli stepped down?: लोकांना हे समजणार नाही; विराट कोहलीनं सांगितलं RCBचे कर्णधारपद सोडण्यामागचं खरं कारण!

Why Virat Kohli stepped down? - भारतीय संघाचा माजी कर्णधार व स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी जे फटाके फोडले, त्यामागचं उत्तर अजूनही सापडत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 3:26 PM

Open in App

Why Virat Kohli stepped down? - भारतीय संघाचा माजी कर्णधार व स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी जे फटाके फोडले, त्यामागचं उत्तर अजूनही सापडत नाही. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर आली असताना विराटने ट्विट केले आणि वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आपण ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी राहणार नाही, हे जाहीर केले. त्यानंतर त्याने आयपीएल २०२१च्या आधी अशीच घोषणा केली. त्यामुळे आता विराट कर्णधार म्हणून अखेरच्या वर्ल्ड कप आणि आयपीएल स्पर्धेत जेतेपदाची माळ गळ्यात घालेल, अशी आशा वाटली. पण, घडले उलटेच. त्यानंतर विराटकडून BCCIने वन डे संघाचे कर्णधारपद काढून घेतले आणि दक्षिण आफ्रिका दौरा संपताच विराटने कसोटी संघाचीही जबाबदारी खांद्यावरून उतरवली.  विराटच्या या झटपट निर्णयांवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. 

BCCI vs Virat या वादामुळे विराटने टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले, असा अंदाज लावला गेला आणि  त्याला पूरक अशा घटनाही घडल्या. पण, आयपीएलमधील रॉल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचे कर्णधारपद सोडण्यामागे तसा कोणताच वाद नव्हता. मग, विराटने हा निर्णय का घेतला? आयपीएलमध्ये एकाच संघाकडून १४ वर्ष खेळणारा विराट हा कदाचित एकमेव खेळाडू असेल आणि त्याने सर्वाधिक काळ RCBचे कर्णधारपदही भूषविले. २०१६ मध्ये त्यांना जेतेपदाच्या जवळजाऊन माघारी फिरावे लागले. विराटने आयपीएलमध्ये २०७ सामन्यांत ६२८३ धावा केल्या आहेत आणि त्यात पाच शतकं व  ४२ अर्धशतकांचा समावेश आहे.   RCBचा माजी कर्णधार विराट कोहलीने सांगितले की, लोकं जोपर्यंत तुम्ही ज्या परिस्थितीत आहात तेथे उभे राहत नाही, तोपर्यंत तुम्ही घेतलेला निर्णय त्यांना कळणार नाही. त्यामुळे जेव्हा मी हा निर्णय घेतला, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया, 'ओह!, हे असं कसं झालं? आम्हाला धक्का बसला', अशा होत्या. पण, यात धक्का बसण्यासारखे काहीच नाही. मी लोकांना समजावून सांगतो, मला माझी मोकळीक हवी होती आणि माझ्यावरील वर्कलोडचे नियोजन करायचे होते आणि इथे गोष्ट संपते.''

तो म्हणाला,''मला सरळ-सोपं आयुष्य जगायला आवडतं. त्यामुळे जेव्हा मला तो निर्णय घ्यावासा वाटला, तो मी घेतला आणि जाहीर केला. त्यासाठी मला आणखी एक वर्ष चिंतन करण्यात घालवायचे नव्हते. क्वालिटी ऑफ लाईफ हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.''  

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२२
Open in App