Join us  

"... म्हणून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनेल", एबी डिव्हिलियर्सचा मोठा दावा

hardik pandya ipl : आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 8:01 PM

Open in App

आयसीसी वन डे विश्वचषकाच्या यंदाच्या हंगामाची सांगता झाल्यानंतर आयपीएलच्या आगामी हंगामाची चर्चा रंगली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. आयपीएल २०२४ ला सुरूवात होण्यासाठी आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. यासाठी १९ डिसेंबरला खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची घरवापसी होणार असल्याचे कळते. हार्दिकची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एन्ट्री होऊ शकते. हार्दिकबद्दल या चर्चा सुरू असताना दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने एक मोठे विधान केले. 

हार्दिकची घरवापसी होणार?मिस्टर ३६० ने त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितले की, रोहित शर्मा हार्दिक पांड्याला कर्णधारपद सोपवले हे मला विचित्र वाटते. पण, रोहितवर भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा खूप दबावही असू शकतो. अशा स्थितीत हार्दिक मुंबई इंडियन्सच्या संघाने कर्णधारपद सांभाळून रोहितचा भार कमी करू शकतो. मुंबईच्या संघासाठी ही मोठी बाब आहे. याशिवाय पांड्याला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळायला आवडते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईच्या फ्रँचायझीला हार्दिकला मानधन म्हणून आणि गुजरात टायटन्सला ट्रान्सफर फी म्हणून १५ कोटी रूपये द्यावे लागतील. हस्तांतरण शुल्काच्या रकमेबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हार्दिकला ट्रान्सफर फीच्या ५० टक्के रक्कम मिळणार आहे. खरं तर हार्दिकने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. 

IPL ची आगामी हंगामाकडे कूच दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात २०२२ मध्ये गुजरातचा संघ चॅम्पियन झाला होता. तसेच त्याच्या पुढच्या हंगामात गुजरातला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. अशातच हार्दिक गुजरातची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मुंबई त्याला ट्रेड विंडोद्वारे आपल्या संघात सामील करू इच्छित आहे. गुजरातही हार्दिकला सोडण्याच्या तयारीत आहे. मात्र, मुंबईकडे सध्या निधीची कमतरता असल्याने मोठा पेच निर्माण झाला. २६ तारखेपूर्वी मुंबईच्या फ्रँचायझीला ही रक्कम भरावी लागणार आहे. पण हा करार जवळपास निश्चित झाल्याचे कळते. 

टॅग्स :हार्दिक पांड्याएबी डिव्हिलियर्सआयपीएल २०२३मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्स