T20 World Cup 2024 : पाकिस्तानी संघाला ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मध्ये साखळी फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. T20 World Cup 2024 स्पर्धेत पाकिस्तानी संघाची फार वाईट अवस्था झाली. सुरुवातीला पाकिस्तानचा अमेरिकेने पराभव केला. त्यापाठोपाठ भारतानेही त्यांना पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानने आयर्लंड आणि कॅनडाविरोधात विजय मिळवला पण तरीही त्यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे पाकिस्तानी खेळाडूंना आता चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाचा पर्दाफाश केला.
वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, वहाब रियाज आणि मोहम्मद आमिर हे दोघे पाकिस्तानातील वृत्तवाहिनीवर बोलताना याच पाकिस्तान संघावर टीका करायचे. आता हे दोघेही पाकिस्तानच्या संघाचा भाग आहेत. जेव्हा ते संघाबाहेर होते तेव्हा अनेकांना क्रिकेट कसे खेळायचे याचे सल्ले देत असत. आज एक निवडकर्ता आणि एक प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. मग त्यांनी संघासाठी काय योगदान दिले. केवळ इमाद वसीमसारख्या जवळच्या सहकाऱ्यांना संघात संधी दिली. समजा आज अजित आगरकर अध्यक्ष असता आणि तो बोलला की, वीरू ये तुचे पुनरागमन करतो... हे असे नाही होऊ शकत. निवडकर्ता जो असतो त्याने भविष्याचा विचार करणे गरजेचे असते. ते पाकिस्तानी संघात होत नाही. सेहवाग 'क्रिकबज'वर बोलत होता.
दरम्यान, ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ च्या तोंडावर मोहम्मद आमिर आणि इमाद वसीम यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा परतण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केल्यानंतर आमिर आणि वसीम यांच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला. मोहम्मद आमिरला साजेशी खेळी करण्यात यश आले पण इमाद वसीमच्या हाती निराशा लागली. आमिरने भारताविरूद्धच्या सामन्यात दोन बळी घेतले होते.
बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाला भारतात पार पडलेल्या वन डे विश्वचषकात देखील चांगली कामगिरी करता आली नाही. अफगाणिस्तानने शेजाऱ्यांना पराभवाची धूळ चारली होती. यावेळी ट्वेंटी-२० विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तानचा पराभव करून मोठा उलटफेर केला.
Web Title: Former T20 World Cup 2024 Team India player Virender Sehwag has criticized Pakistan's Mohammad Amir and Wahab Riaz
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.