Join us

टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या वडिलांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा, कारण काय? 

Naman Ojha's father News: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू नमन ओझा याचे वडील विनय ओझा यांना ७ वर्षांचा कारावास आणि १४ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 22:27 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू नमन ओझा याचे वडील विनय ओझा यांना ७ वर्षांचा कारावास आणि १४ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एका शाखेत केलेल्या १ कोटी २५ लाखांच्या अफरातफरी प्रकरणी कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. २०१३ मध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. आता ११ वर्षांनंतर कोर्टाने या प्रकरणी निकाल देत नमन ओझा याचे वडील विनय ओझा यांना ही शिक्षा सुनावली आहे. 

२०१३ मध्ये झालेल्या या घोटाळ्या प्रकरणी विनय ओझा यांच्याविरोधात २०१४ मध्ये फसवणूक आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते फरार होते. दरम्यान, विनय ओझा यांना २०२२ मध्ये बैतूल पोलिसांनी इंदूर येथून अटक केली होती. आता  मध्य प्रदेशमधील मुलताई येथील अप्पर सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार विनय ओझा यांना ३४ बनावट खाती उघडून ही फसवणूक केली होती. तसेच किसान क्रेडिट कार्डवरून घेतलेलं कर्ज त्या खात्यांवर वळवलं होतं. या बनावट खात्यांवरून सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम वळवण्यात आली होती. या प्रकरणातील तीन इतर आरोपी असलेल्या अभिषेक रत्नम, धनराज आणि लखनलाल यांनाही कारावास आणि दंडात्मक कारवाईची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीभारतीय क्रिकेट संघपरिवारमध्य प्रदेश