कोलकाता येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी यावरून रोष व्यक्त करत आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू सौरव गांगुलीने देखील याप्रकरणी बोलताना संताप व्यक्त केला. कोलकाता येथील कनिष्ठ महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. हृदयात धडकी भरवणारी ही घटना कानावर पडताच अंगावर काटा येतो. आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली अन् एकच खळबळ माजली. हे प्रकरण तापले असताना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी मात्र कोणतेही गांभीर्य न बाळगता संतापजनक विधान केल्याचा आरोप आहे. सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले आहे. डॉ. घोष हे कोलकाता येथील त्याच आर. जी. कार मेडिकल कॉलेजचे प्राचार्य होते, जिथे ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली.
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सौरव गांगुलीने सांगितले की, ही खूपच भयंकर घटना आहे आणि जे घडले ते अतिशय लज्जास्पद आहे. सीबीआय आणि पोलीस याचा तपास करत आहेत, आणि मला आशा आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. खरे तर या घटनेचा निषेध म्हणून डॉक्टर संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
मृत महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, मृत महिला डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टवर खोल जखम झाली होती. गळा दाबला गेला, पोट, ओठ, बोटे आणि डाव्या पायावर जखमेच्या खुणा होत्या. तिच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात वार करण्यात आले की चष्मा तुटून डोळ्यात घुसला. याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. (kolkata murder case doctor) विशेष बाब म्हणजे असे असताना देखील संबंधित ट्रेनी डॉक्टरने आत्महत्या केल्याचे रुग्णालयाने मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांना सांगितले. आत्महत्येचे कारण खुद्द डॉक्टर घोष यांनी दिल्याचा आरोप आहे. (kolkata murder case girl) या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने डॉ. घोष यांना वारंवार चौकशीसाठी बोलावले, पण ते गेले नाहीत. अखेर १६ ऑगस्ट रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले. (kolkata murder case full story in marathi)
Web Title: Former Team India cricketer Sourav Ganguly expressed his anger on Kolkata Doctor Case
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.