Join us

मोहम्मद अजहरुद्दीन हाजीर हो! पण त्यानं ईडीकडं वेळ मागितला; माजी खेळाडूवर गंभीर आरोप

मोहम्मद अजहरुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 12:57 IST

Open in App

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीनच्या अडचणीत वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रवर्तन निदेशालयाने अर्थात ईडीने त्याला समन्स बजावले पण त्याने वेळ आज हजर राहणे टाळले. त्याच्यावर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील (HCA) अनियमिततेचा आरोप आहे. अजहरुद्दीनने असोसिएशनमध्ये २० कोटी रुपयांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. अझरुद्दीनला आज ईडीसमोर हजर व्हावे लागणार होते पण त्याने वेळ मागितला. अझरुद्दीनची सप्टेंबर २०१९ मध्ये हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. जून २०२१ मध्ये त्याला हे पद सोडावे लागले होते. असोसिएशनच्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. ईडीने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. तसेच ईडीने तेलंगणातील नऊ ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावा म्हणून उपकरणे जप्त केली आहेत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीवेळी पैशांचा गैरवापर केला. त्यांनी खासगी कंपन्यांना मोठ्या दराने कंत्राटे देऊन असोसिएशनचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी ईडीने तीन एफआयआर नोंदवले असून पुढील तपास सुरू आहे. क्रिकेटपटू ते नेता असा अजहरुद्दीनचा प्रवास राहिला आहे. त्याने २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून खासदार होण्याचा मान पटकावला. २०१४ मध्ये त्याने राजस्थानमधून निवडणूक लढली पण त्याला पराभव स्वीकारावा लागला. २०१८ मध्ये त्याच्यावर तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.  भारतीय संघातील एक प्रभावी खेळाडू म्हणून मोहम्मद अजहरुद्दीनची ओळख आहे. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. मात्र, २०२० मध्ये मॅच फिक्सिंगमध्ये नाव आल्याने त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. त्याने भारतासाठी ९९ कसोटी, ३३४ वन डे सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीमध्ये २२ आणि वन डेमध्ये ७ शतकांची नोंद आहे. 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयहैदराबादऑफ द फिल्ड