...म्हणूनच मी सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो; MS Dhoni ने सांगितलं भारी कारण

MS Dhoni React On Thala For A Reason : धोनीने चाहत्यांचे आभार मानले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:39 PM2024-08-01T17:39:36+5:302024-08-01T17:40:10+5:30

whatsapp join usJoin us
Former Team India player MS Dhoni commented on Thala for a reason | ...म्हणूनच मी सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो; MS Dhoni ने सांगितलं भारी कारण

...म्हणूनच मी सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो; MS Dhoni ने सांगितलं भारी कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MS Dhoni On Social Media : महेंद्रसिंग धोनी म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वाधिक तीनवेळा आयसीसी ट्रॉफीचा किताब जिंकला आहे. कॅप्टन कूल, माही, दिग्गज अशा विविध नावांनी ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी... (ms dhoni speak on his fans) आजही धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. चाहत्यांचा लाडका माही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आयपीएलच्या माध्यमातून आजही चाहत्यांना हेलिकॉप्टर शॉटचा नजारा दाखवतो. धोनीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. प्रचंड मेहनत आणि मैदानावरील खेळीने त्याने क्रिकेटविश्वात त्याचे नाव धसधशीत उमटवले आहे. केवळ मैदानावरील उत्कृष्ट कामगिरीनेच नाही तर धोनी त्याच्या कृतीने प्रेक्षकांची मने जिंकतो. सोशल मीडियावर फार सक्रिय नसणाऱ्या धोनीने प्रथमच याबद्दल भाष्य केले आहे. (ms dhoni latest news) 

एका कार्यक्रमात धोनीला थाला फॉर अ रिजनबद्दल विचारणा केली असता त्याने भारी उत्तर दिले. धोनी म्हणाला की, मला स्वत:ला हे माहिती नाही. मला इन्स्टाग्रामवरून सर्वकाही समजले. मला माझ्या चाहत्यांचा अभिमान वाटतो. मला सोशल मीडियावर, इन्स्टाग्रामवर येऊन बोलण्याची जास्त गरज भासत नाही. जेव्हा कधी गरज भासते तेव्हा चाहते माझा बचाव करतात. त्यामुळे मला काहीच करावे लागत नाही. मी सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो तरी देखील चाहते माझ्या पोस्टच्या प्रतीक्षेत असतात. यामुळे मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. खरे तर धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी त्याची पत्नी साक्षी धोनी चाहत्यांना त्यांच्या लाडक्या माहीची झलक दाखवत असते. ती धोनीचे नवनवीन फोटो शेअर करत असते. 

दरम्यान, धोनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने तीनवेळा आयसीसीचा किताब जिंकला आहे. धोनी कर्णधार असताना भारताला एक ट्वेंटी-२० विश्वचषक, एक वन डे विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश आले. २०१३ मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रूपात आयसीसीचा किताब जिंकला होता. तेव्हापासून मोठ्या कालावधीपर्यंत टीम इंडिया आयसीसी ट्रॉफीच्या प्रतिक्षेत होती. मात्र, रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब जिंकून तमाम भारतीयांची इच्छा पूर्ण केली. 

Web Title: Former Team India player MS Dhoni commented on Thala for a reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.