Join us  

बाप तसा बेटा! Rahul Dravid चा लेक ट्वेंटी-२० लीग खेळणार; पण केवळ 'इतके'च पैसे मिळणार

Maharaja Trophy KSCA T20 : विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयने १२५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 4:47 PM

Open in App

KSCA T20 Mysore Warriors Welcome Samit Dravid : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड. त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ चा किताब उंचावला. द्रविड यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत भारतीय क्रिकेटमध्ये खूप योगदान दिले. त्यांचा मोठा मुलगा समित द्रविडही क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द घडवत आहे. समित द्रविडने कर्नाटकात होणाऱ्या महाराजा ट्रॉफी KSCA T20 या क्रिकेट लीगसाठी म्हैसूर वॉरियर्सचे तिकीट मिळवले आहे. KSCA T20 लिलावात म्हैसूर वॉरियर्सने द्रविड यांच्या लेकावर बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात घेतले. खरे तर विश्वचषक विजेत्या संघाला बीसीसीआयने १२५ कोटी रूपयांचे बक्षीस दिले. राहुल द्रविड यांना यातील पाच कोटी रूपये मिळणार होते. पण, त्यांनी यातील निम्मी रक्कम अर्थात २.५ कोटी घेणे पसंद केले. 

द्रविड यांच्या मुलाला मिळालेल्या रकमेची सर्वत्र चर्चा होत आहे. खरे तर म्हैसूर वॉरियर्सने मधल्या फळीतील फलंदाज आणि वेगवान गोलंदाज समित द्रविडला ५० हजार रुपयांत आपल्या संघाचा भाग बनवले. परंतु, इतर खेळाडूंवर लाखो रूपयांचा वर्षाव झाला. म्हैसूर वॉरियर्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, समित हा एक चांगला फलंदाज आहे. त्याने विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये केएससीएसाठी चांगली कामगिरी केली आहे.

दरम्यान, समित द्रविड कूचबिहार ट्रॉफी जिंकणाऱ्या कर्नाटक अंडर-१९ संघाचा भाग होता. मागील हंगामातील उपविजेत्या म्हैसूर वॉरियर्सच्या संघाचे कर्णधारपद करुण नायरकडे आहे. याशिवाय एक लाख रुपयांना विकत घेतलेला भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या उपस्थितीमुळे त्यांची गोलंदाजी मजबूत होईल असे दिसते. वॉरियर्सचा कर्णधार नायरला फ्रँचायझीने रिटेन केले होते, तर प्रसिध्द कृष्णाच्या डाव्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तो इथे चांगली कामगिरी करून पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.

म्हैसूर वॉरियर्सचा संघ - करुण नायर (कर्णधार), कार्तिक सीए, मनोज भंडारी, कार्तिक एसयू, सुचित जे, गौतम के, विद्याधर पाटील, व्यंकटेश एम, हर्षिल धर्मानी, गौतम मिश्रा, धनुष गोडा, समित द्रविड, दीपक देवदेव, सुमित कुमार, स्मयन श्रीवास्तव, जास्पर ईजे, प्रसिद्ध कृष्णा , मोहम्मद सरफराज अश्रफ.

टॅग्स :राहुल द्रविडभारतीय क्रिकेट संघ