Join us  

Winston Benjamin Sachin Tendulkar: वेस्ट इंडिजच्या माजी क्रिकेटपटूनं सचिनकडे मागितली मदत; म्हणाले, पैसे नकोत फक्त एक...

Winston Benjamin Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एकेकाळी आपल्या भेदक गोलंदाजीनं जेरीस आणणाऱ्या वेस्ट इंडिजच्या माजी गोलंदाजानं मदतीची विनंती केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 3:07 PM

Open in App

Winston Benjamin Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एकेकाळी आपल्या भेदक गोलंदाजीनं जेरीस आणणाऱ्या वेस्ट इंडिजच्या माजी गोलंदाजानं मदतीची विनंती केली आहे. सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांना आपला मित्र मानणाऱ्या वेस्ट इंडिजच्या विन्स्टन बेंजामिन यांनी वेस्ट इंडिज क्रिकेटला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. 

बेंजामिन यांनी सचिन तेंडुलकरसह भारतीय संघ तसंच आयपीएलमध्ये खेळणाऱ्या दिग्गद क्रिकेटपटूंना आवाहन केलं आहे. पण आपल्याला कोट्यवधी रुपयांची मदत नको, फक्त क्रिकेटचं साहित्य मिळवून द्या, असं बेंजामिन यांनी म्हटलं आहे. 

युवा क्रिकेटपटूंसाठी मागितली मदतबेंजामिन यांनी सचिनकडे १० ते १५ बॅट आणि काही क्रिकेट साहित्याची मागणी केली आहे. क्रिडा पत्रकार विमल कुमारच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत हे आवाहन केलं आहे. तसंच मोहम्मद अझरुद्दीननं केलेल्या मदतीचीही माहिती त्यांनी दिली आणि त्याचे जाहीर आभार देखील व्यक्त केले. वेस्ट इंडिजमधील स्थानिक क्रिकेटपटूंना चांगल्या सुविधा आणि क्रिकेटच्या प्रगतीसाठी बेंजामिन प्रयत्न करत आहेत. 

"शारजामध्ये याआधी अनेक सामने व्हायचे. ज्याचा फायदा वेस्ट इंडिज क्रिकेटलाही होत होता. पण मला पैशांची मदत नकोय. असे लोक हवे आहेत की जे क्रिकेटचं साहित्य देतील. मला हजारो डॉलर्स नकोत. फक्त कुणीतरी १०-१५ क्रिकेट बॅट पाठवून द्या. हे माझ्यासाठी खूप आहे. क्रिकेटचं साहित्य मिळालं तर मी ते इथं युवा क्रिकेटपटूंना देऊ शकेन", असं बेंजामिन म्हणाले. 

"सचिन जर मला मदत करु शकणार असेल तर प्लीज त्यानं माझी मदत करावी. मी माझा मित्र मोहम्मद अझरुद्दीनचेही आभार व्यक्त करू इच्छितो. त्यानंही काही साहित्य पाठवलं आहे. त्यासाठी मी आभारी आहे", असं बेंजामिन यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरवेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ
Open in App