भारतानं कोरोना व्हायरसच्या ( Corona virus) लढाईत मोठं यश मिळवलं आहे. भारतानं तयार केलेली कोरोना लस ( Corona Vaccine) फक्त भारतीय नागरिकांनाच नव्हे, तर जगभरात अनेक देशांना पाठवली आहे. भारतानं आतापर्यंत भूटान, मालदीप, मॉरिशस, बहरीन, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका या देशांना कोरोना लस पाठवले आहे. आता त्यात वेस्ट इंडिजचीही भर पडली आहे. भारत सरकारनं कॅरेबियन देशांना कोरोना लस दिली आणि त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व्हिव्हिए रिचर्ड्स यांच्यासह अन्य तीन माजी क्रिकेटपटूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.
रिचर्ड्स यांनी ट्विट केलं की, अँटीगा आणि बार्बाडोस येथील लोकांच्या वतीनं मी भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला कोरोना लस पाठवली. यानं भविष्यात दोन देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील.'' इशान किशननं फक्त मॅचच नाही, तर मनही जिकंली; सामन्यानंतर त्यानं जे केलं त्याचं होतंय कौतुक!
रिची रिचर्ड्सन म्हणाले,'' अँटीगा आणि बार्बाडोस येथील लोकांच्या वतीनं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. त्यांनी आमच्यासाठी कोरोना लसीचे ४० हजार डोस पाठवले.''