Join us  

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका अन् Fortune cooking oilनं मागे घेतल्या 'त्या' सर्व जाहिराती!

मागील आठवड्यात भारताचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 05, 2021 3:17 PM

Open in App

मागील आठवड्यात भारताचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्याच्यावर कोलकातातील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याची प्रकृती सुधारली असून बुधवारी त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, गांगुली आजारी पडल्यानंतर तो जाहिरात करत असलेल्या Fortune Rice Bran cooking oil च्या सर्व जाहिराती मागे घेण्यात आल्याचे अदानी विल्मारने जाहीर केले. Fortune Rice Bran cooking oil हे निरोगी हृदयासाठी फायद्याचे असल्याची जाहिरात गांगुलीनं केली होती. 

या जाहिराती मागे घेण्याच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली व त्यांना ट्रोलही केलं गेलं. ''हे तेल तुमची प्रतिकारशक्ती वाढवते,''अशी या जाहिरातीची टॅगलाईन होती. गांगुलीला हृयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ट्रोल केले गेले. छातीत दुखू लागल्यामुळे शनिवारी गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्याची प्रकृती सुधारली असून त्याला डिस्चार्ज दिला जाईल. त्याच्यावर घरीच उपचार सुरू राहतील, असे डॉक्टरांनी सांगितले.  

प्रसिद्ध सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन गांगुलीच्या प्रकृतीची पाहणी केली. अनेक भारतीयांमध्ये हृदयासंदर्भात आढळणारा आजार गांगुलीला झाला आहे. पण, त्यामुळे त्याच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही. त्याच्यावर नित्यक्रमानं अँजिओप्लास्टीची गरज आहे आणि औषध व काळजी घेतल्यानंतर तो पुन्हा पूर्वीसारखा कामकाज करू शकतो. पुढील दोन आठवड्यात त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येतील, असे  शेट्टी यांनी सांगितले.   गांगुलीवर उपचार करण्यासाठी १३ वैद्यकिय सदस्यांची टीम काम करत होती. गांगुलीची अँजिओप्लास्टी करण्यात आली.    दरम्यान, माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनीही फॉर्च्युनच्या जाहिरातीवरून गांगुलीला टोमणाही मारला आणि प्रकृती सुधारण्याच्या शुभेच्छाही दिल्या.

टॅग्स :सौरभ गांगुलीजाहिरात