Join us  

मोटेरा स्टेडियममध्ये चार ड्रेसिंग रूम्स, एलईडी लाईट्‌स, ५५ हजार तिकिटांची विक्री

Motera Stadium : रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील, असा दावा गुजरात क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव अनिल पटेल यांनी बुधवारी केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 6:07 AM

Open in App

अहमदाबाद : येथील मोटेराच्या नवनिर्मित सरदार पटेल स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. येथे २४ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात दिवस-रात्र तिसरा कसोटी सामना खेळला जाईल. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील, असा दावा गुजरात क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव अनिल पटेल यांनी बुधवारी केला. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये तब्बल ११ मध्यवर्ती खेळपट्ट्या आहेत. शिवाय जिमसह चार ड्रेसिंग रूम्स आहेत.मोटेरा स्टेिडयमच्या पुनर्बांधणीचे काम सध्या बीसीसीआय सचिव असलेले जय शाह हे राज्य संघटनेचे अध्यक्ष असताना सुरू झाले. या स्टेडियममध्ये एक लाख दहा हजार प्रेक्षक सहज बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात. मेलबोर्न क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. जीसीए स्टेडियममध्ये होणाऱ्या पुढील दोन सामन्यांसाठी जवळपास ५५ हजार तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. अलीकडे सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतील बाद फेरीचे सामने येथेच पार पडले.‘मुख्य मैदानाच्या मध्यभागी ११ खेळपट्टया असलेले जगातील हे एकमेव स्टेडियम आहे. याशिवाय सराव आणि मध्यभागी खेळपट्टया एकाच मातीपासून तयार करण्यात आलेलेदेखील हे एकमेव स्टेडियम ठरले आहे. प्रेक्षकांना विनाअडथळा सामना पाहता यावा आणि खेळाडूंची सावली पडू नये यासाठी स्टेडियमच्या छतावर एलईडी लाईट्‌स लावले आहेत.’ - अनिल पटेल, संयुक्त सचिव जीसीए

टॅग्स :गुजरात