Join us  

चार सामने मालिकेसारखे खेळलो : लोकेश राहुल

Lokesh Rahul : वन डे आणि टी-२० मालिकेत भारतीय संघाच्या मुसंडी मारण्याचे रहस्य उघड करताना भारतीय संघाचा उपकर्णधार लोकेश राहुल याने पहिल्या दोन वन डेत झालेल्या पराभवानंतर उर्वरित चार सामन्यात आम्ही नव्या मालिकेत खेळत असल्यासारखा खेळ केला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 5:17 AM

Open in App

सिडनी :  वन डे आणि टी-२० मालिकेत भारतीय संघाच्या मुसंडी मारण्याचे रहस्य उघड करताना भारतीय संघाचा उपकर्णधार लोकेश राहुल याने पहिल्या दोन वन डेत झालेल्या पराभवानंतर उर्वरित चार सामन्यात आम्ही नव्या मालिकेत खेळत असल्यासारखा खेळ केला.  या बळावर विजय मिळविणे सोपे झाले होते, असे राहुलने सांगितले.भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात निराशादायी करताना सुरुवातीच्या दोन्ही वन डे लढती आणि मालिका गमावली होती. त्यानंतर दुसरा वन डे आणि दोन टी-२० लढतीत लागोपाठ विजय साजरे केले. राहुल म्हणाला,‘ऑस्ट्रेलिात सुरुवातीच्या पराभवानंतर मुसंडी मारणे सोपे नाही. आम्ही संघात चर्चा केली. सर्व चारही सामने नव्या मालिकेत खेळल्यासारखे जिंकायचे असा निर्धार केला. ही मालिका आव्हानात्मक असून यजमान संघाने प्रत्येक आघाडीवर आमची परीेक्षा घेतली. वन डे आणि टी-२० मालिका आमच्यासाठी मोठा बोध आहे. सांघिक खेळीच्या बळावर एकमेकांवर विश्वास टाकून आम्ही विजय साजरे केले. पुढेही अशीच कामगिरी सुरू राहील, अशी आशा आहे.’  संजू सॅमसन म्हणाला,‘दीर्घकाळ घराबाहेर राहणे कठीण होते. तथापि आम्ही सर्वांनी साहस दाखवले. सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर असे धडाकेबाज पुनरागमन करणे आमच्यासाठी शानदार ठरले. 

सांघिक प्रयत्नांनी विजयnटी-२० मालिकेत प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार विजेता हार्दिक पांड्या म्हणाला,‘आम्ही मालिका जिंकल्याचा आनंद आहे. हा विजय वैयक्तिक कामगिरीमुळे नव्हे सांघिक प्रयत्नांमुळे साकार होऊ शकला. ’हार्दिकने वन डेत  २१० आणि टी-२० त ७८ धावा ठोकल्या.पांड्याने यावेळी टी नटराजनच्या संघर्षाचे कौतुक केले. स्वत:वर विश्वास राखून हा खेळाडू इथपर्यंत आला. अनेकांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी,’ असे पांड्या म्हणाला.nवॉशिंग्टन सुंदर, संजू सॅसमन आणि मनीष पांडे हे आता भारतात परतणार आहेत.  सुंदर म्हणाला,‘मी देशासाठी चांगला खेळ करण्याच्या निर्धाराने येथे आलो होतो. मालिका जिंकल्याचा आनंद वाटतो.’

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघ