Join us  

दुलीप ट्रॉफीसाठी ४ संघांची घोषणा; मराठमोळा ऋतुराजही कर्णधार, वरिष्ठ खेळाडूंचे करणार नेतृत्व

दुलीप ट्रॉफी २०२४ साठी बीसीसीआयने चार संघांंची घोषणा केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 5:28 PM

Open in App

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी २०२४ साठी बीसीसीआयने चार संघांंची घोषणा केली आहे. शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर हे चार कर्णधार असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी देशांतर्गत क्रिकेटमधील नामांकित अशा दुलीप ट्रॉफीसाठीच्या पहिल्या फेरीसाठी संघांची घोषणा केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये लाल-बॉल क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये काही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले शिलेदारही दिसतील. ही स्पर्धा ५ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होईल. आंध्र प्रदेश आणि बंगळुरू येथे सामने खेळवले जातील. 

१९ सप्टेंबरपासून टीम इंडिया मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफीच्या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूला बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत संधी मिळाल्यास त्याच्या जागी नव्या चेहऱ्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. नितीश रेड्डीची उपलब्धता फिटनेसवर अवलंबून आहे. 

अ संघ - शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, लोकेश राहुल, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वथ कावेरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत. 

ब संघ - अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, रिषभ पंत, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, साई किशोर, मोहित अवस्थी, एन नटराजन.

क संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, सूर्यकुमार यादव, बी इंद्रजित, हृथिक शौकीन, मानव सुतार, उमरान मलिक, व्यशक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशू चौहान, मयंक मार्कंडेय, आर्यन जुयाल, संदीप वॉरियर.

ड संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिकल, इशान किशन, रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेंगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार.

टॅग्स :बीसीसीआयशुभमन गिलऋतुराज गायकवाडश्रेयस अय्यर