Join us  

Gustav Mckeon : १८ वर्षीय पोरानं दिग्गजांना जे नाही जमलं ते करून दाखवलं, ट्वेंटी-२०त २४ तासांत दुसरं शतक झळकावलं!

फ्रान्सचा फलंदाज गुस्ताव्ह मॅककेओन ( Gustav McKeon) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वादळ आणले आहे.  १८ वर्षीय  गुस्ताव्हने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा विक्रम मंगळवारीच नावावर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 11:08 PM

Open in App

फ्रान्सचा फलंदाज गुस्ताव्ह मॅककेओन ( Gustav McKeon) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वादळ आणले आहे.  १८ वर्षीय  गुस्ताव्हने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा विक्रम मंगळवारीच नावावर केला. त्यानंतर २४ तासांत त्याने दुसरे ट्वेंटी-२० शतकही झळकावले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा नावावर असलेल्या मार्टीन गुप्तील, रोहित शर्मा, विराट कोहली आदी दिग्गजांनाही जे जमले नाही ते या पोरानं करून दाखवलं. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा गुस्ताव्ह हा जगातील पहिला फलंदाज ठरला.

मंगळवारी  आयसीसी वर्ल्ड कप २०२४ युरोप उप विभागीय पात्रता ( T20 World Cup 2024 Europe Sub-Regional Qualifiers) स्पर्धेत गुस्ताव्हने स्वित्झर्लंडविरुद्ध ६१ चेंडूंत १०९    धावांची स्फोटक खेळी केली होता. त्याने ( १८ वर्ष व २८० दिवस) अफगाणिस्ताचा हझरतुल्लाह झझाई ( Hazratullah Zazai) याचा विश्वविक्रम मोडला. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्ताच्या या सलामीवीराने आयर्लंडविरुद्ध १६२ धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याचे वय २० वर्ष व ३३७ दिवस होते आणि तो ट्वेंटी-२०तील सर्वात युवा फलंदाज ठरला होता. गुस्ताव्हने स्वित्झर्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना 5 चौकार व 9 षटकारांची बरसात करून 14 चेंडूंतच 74 धावांचा पाऊस पाडला.  

ट्वेंटी-20त शतक झळकावणारे युवा फलंदा

  • गुस्ताव्ह मॅककेओन - 18 वर्ष व 280 दिवस, फ्रान्स वि. स्वित्झर्लंड, 2022
  • हझरतुल्लाह झझाई - 20 वर्ष व 337 दिवस, अफगाणिस्तान वि. आयर्लंड, 2019
  • शिवकुमार पेरीमालवार - 21 वर्ष व 161 दिवस, रोमानिया वि. तुर्की, 2019
  • ऑर्चिड तुयीसेंगे - 21 वर्ष व 190 दिवस, रेवांडा वि. सेयचेलेस, 2021
  • दिपेंद्र सिंग ऐरी - 2cr2 वर्ष व 68 दिवस, नेपाळ वि. मलेशिया, 2022

 

बुधवारी नॉर्वे ( Norway) विरुद्धच्या लढतीत गुस्ताव्हने ५३ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली आणि संघाला ७ बाद १५८ धावांपर्यंत मजल मारून दिली. नॉर्वेचा संघ १४७ धावांत माघारी पाठवून फ्रान्सने ११ धावांनी सामना जिंकला.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१फ्रान्स
Open in App