नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेत लवकरच मिनी आयपीएलचा थरार रंगणार आहे. क्रिकबजने दिलेल्या रिपोर्टनुसार, इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) काही फ्रँचायझी दक्षिण आफ्रिकेत सुरू होणाऱ्या टी-२० लीगमधील संघ खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाचे मालक अंबानी, एन श्रीनिवासन यांची चेन्नई सुपरकिंग्स, पार्थ जिंदल यांची दिल्ली कॅपिटल्स, मारन यांची सनरायझर्स हैदराबाद, संजीव गोएंका यांची लखनऊ सुपर जायंट्स आणि मनोज बदाले यांच्या राजस्थान रॉयल्स या फ्रँचायझींनी आफ्रिकेच्या मिनी आयपीएलमधील संघ खरेदी करण्यास पसंती दर्शवली आहे.
टूर्नामेंटमधील संघ खरेदी करण्यासाठी बोली लावण्याची शेवटची तारीख ११ जुलै होती, मात्र त्यामध्ये वाढ करण्यात आली. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (CSA) फ्रँचायझीची निवड या महिन्याच्या शेवटी जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. माहितीनुसार गुंतवणूकदारांना त्यांच्या यशस्वी बोलीबद्दल माहिती देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या फ्रँचायझीने सर्वांधिक किमतीची बोली लावली आहे, ज्याची रक्कम जवळपास २५० कोटींच्या घरात आहे. आयपीएल मॉडेलनुसार प्रत्येक फ्रँचायझीला १० वर्षांसाठी फ्रँचायझी फीच्या १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
कोणत्या संघाला कोणती फ्रँचायझी?
मुंबई इंडियन्सने केपटाउनमध्ये आपला संघ बनवण्यास पसंती दर्शवली आहे. आयपीएमधील सर्वांत लोकप्रिय असलेल्या चेन्नईच्या फ्रँचायझीला जोहान्सबर्ग येथील फ्रँचायझी मिळण्याची दाट शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक जिंदाल यांचा संघ प्रिटोरियातील सेंच्युरियन येथे असेल. जिथे त्याला प्रिटोरिया कॅपिटल्स म्हटलं जाईल. तसेच संजीव गोएंका यांचा कल डरबनकडे असल्याचे बोलले जात आहे. उर्वरित दोन शहरांपैकी सनरायझर्स हैदराबाद पोर्ट एलिझाबेथ असू शकते तर राजस्थान रॉयल्सला पार्लची फ्रँचायझी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Title: Franchise of MI and CSK have bid the highest for the mini IPL to be held in South Africa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.