कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) काही नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यात मुख्य बदल म्हणजे खेळाडूंना आता चेंडू चमकवण्यासाठी थुंकीचा वापर करता येणार नाही. शिवाय कसोटी सामन्यात प्रती डावासाठी तीन,तर मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी दोन DRS घेता येणार आहेत. आता क्रिकेटमध्ये आणखी बदल पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. ट्वेंटी-20त बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
चला करूया सचिन तेंडुलकरच्या BKC येथील आलिशान अपार्टमेंटची सफर!
ट्वेंटी-20त नव्या नियमांच्या शिफारसी केल्या गेल्या आहेत. त्यात पहिल्या 10 षटकांतील धावसंख्येवरून संघाला बोनस पॉईंट दिले जाणार आहेत. त्यानुसार जो संघ पहिल्या 10 षटकांत सर्वाधिक धावा करेल, त्याला हे बोनस पॉईंट मिळतील. तसेच 10 षटकानंतर दोन्ही संघ एक सबस्टिट्यूड ( बदली ) खेळाडू मैदानावर उतरवू शकतात. त्यामुळे सामन्याच्या परिस्थितीनुसार संघ एखाद्या खेळाडूची बदली करू शकतो.
'मी थांबणार नाही'; वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांना इरफान पठाणचं सडेतोड उत्तर
बिग बॅश लीगमध्ये दोन पॉवर प्ले ठेवण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पहिली चार षटकं ही पॉवर प्ले असतील आणि उर्वरित दोन षटकं ही डावात कधीही घेता येतील. फलंदाजी करणारा संघ हा निर्णय घेईल. आतापर्यंत केवळ नो बॉलला फ्री हिट दिले जायचे, परंतु आता वाईड बॉललाही फ्री हिट देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. असं झाल्यास धावांचा पाऊस पडू शकतो. जाहिरातीसाठी प्रत्येक 5 षटकानंतर ब्रेक घेतला जाईल.
या सर्व शिफारसी बिग बॅश लीगच्या 10व्या मोसमासाठी केल्या गेल्या आहेत. त्यामुळे बिग बॅशच्या 10व्या मोसमात आणखी थरार पाहायला मिळण्याची अपेक्षा आयोजकांना आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 खेळवणारच, BCCIने कसली कंबर; सौरव गांगुलीनं राज्य संघटनांना पाठवले पत्र
भावा स्वतःच्या जीवावरच मी इतकी वर्ष खेळलो; रोहित शर्माच्या ट्विटला Yuvraj Singhचं उत्तर
क्वारंटाईन सेंटरमध्ये रंगली क्रिकेट मॅच; माजी मुख्यमंत्र्यांनी शेअर केलेला Video लाखोंनी पाहिला
#MissYouYuvi ट्रेंडवर युवराज सिंगची पत्नी हेझल किचची प्रतिक्रिया, म्हणते...
ऑस्ट्रेलिया दौरा सोपा नसेल; राहुल द्रविडनं कॅप्टन विराट कोहलीला सांगितला धोका
जगातील सर्वात श्रीमंत WWE सुपरस्टार; कमाई ऐकून व्हाल थक्क!
Shocking : आसाममधील गॅस विहिरीच्या भीषण आगीत भारतीय फुटबॉलपटूनं गमावला जीव!