Gustav McKeon : युवा शतकवीर! 18 वर्षीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त झळकावले शतक; 14 चेंडूंत 74 धावांचा पाऊस

अफगाणिस्ताचा हझरतुल्लाह झझाई ( Hazratullah Zazai) याचा विश्वविक्रम मोडला. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्ताच्या या सलामीवीराने आयर्लंडविरुद्ध 62 चेंडूंत 162 धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याचे वय 20 वर्ष व 337 दिवस होते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 12:17 PM2022-07-26T12:17:42+5:302022-07-26T12:18:22+5:30

whatsapp join usJoin us
French batter Gustav McKeon becomes the youngest Men's batter to score a hundred in T20I cricket | Gustav McKeon : युवा शतकवीर! 18 वर्षीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त झळकावले शतक; 14 चेंडूंत 74 धावांचा पाऊस

Gustav McKeon : युवा शतकवीर! 18 वर्षीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त झळकावले शतक; 14 चेंडूंत 74 धावांचा पाऊस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

फ्रान्सचा फलंदाज गुस्ताव्ह मॅककेओन ( Gustav McKeon) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वादळ आणले. 18 वर्ष व 280 दिवस वय असलेल्या गुस्ताव्हने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. आयसीसी वर्ल्ड कप 2024 युरोप उप विभागीय पात्रता ( T20 World Cup 2024 Europe Sub-Regional Qualifiers) स्पर्धेत गुस्ताव्हने 61 चेंडूंत 109 धावांची स्फोटक खेळी केली. पण, स्वित्झर्लंडने 1 विकेट राखून हा सामना जिकंताना गुस्ताव्हचे शतक व्यर्थ ठरवले 

गुस्ताव्हने अफगाणिस्ताचा हझरतुल्लाह झझाई ( Hazratullah Zazai) याचा विश्वविक्रम मोडला. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्ताच्या या सलामीवीराने आयर्लंडविरुद्ध 62 चेंडूंत 162 धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याचे वय 20 वर्ष व 337 दिवस होते आणि तो ट्वेंटी-20तील सर्वात युवा फलंदाज ठरला होता. गुस्ताव्हने स्वित्झर्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना 5 चौकार व 9 षटकारांची बरसात करून 14 चेंडूंतच 74 धावांचा पाऊस पाडला. त्याच्याशिवाय फ्रान्सच्या अन्य फलंदाजांना काही खास करता आले नाही. त्यांना 5 बाद 157 धावाच करता आल्या.

स्वित्झर्लंडचा कर्णधार फहीम  नाझीर ( 67) ने दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर अली नय्यरने 16 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 48 धावा करून फ्रान्सवर 1 विकेट राखून विजय मिळवून दिला. स्वित्झर्लंडने 9 बाद 158 धावा केल्या. 

ट्वेंटी-20त शतक झळकावणारे युवा फलंदा

  • गुस्ताव्ह मॅककेओन - 18 वर्ष व 280 दिवस, फ्रान्स वि. स्वित्झर्लंड, 2022
  • हझरतुल्लाह झझाई - 20 वर्ष व 337 दिवस, अफगाणिस्तान वि. आयर्लंड, 2019
  • शिवकुमार पेरीमालवार - 21 वर्ष व 161 दिवस, रोमानिया वि. तुर्की, 2019
  • ऑर्चिड तुयीसेंगे - 21 वर्ष व 190 दिवस, रेवांडा वि. सेयचेलेस, 2021
  • दिपेंद्र सिंग ऐरी - 2cr2 वर्ष व 68 दिवस, नेपाळ वि. मलेशिया, 2022
     

Web Title: French batter Gustav McKeon becomes the youngest Men's batter to score a hundred in T20I cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.