कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 83,326 वर पोहोचला आहे. त्यापैकी 1 लाख 34,616 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब अशी की 5 लाख 10, 350 रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12,456 वर गेली असून 423 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेताल देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनं त्याच्या फॉलोअर्सवर गुगली टाकली आहे. भज्जीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि त्यानं खेळाडू ओळखण्यास सांगितले आहेत. बघुया तुम्हाला याचं उत्तर सापडतं का?
गेल्या काही दिवसांत भज्जी वेगळ्याच कारणानं चर्चेत राहीला. पाकिस्तानी अष्टपैलू शाहिद आफ्रिदी लॉकडाऊनमुळे त्याच्या देशातील गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहे. भज्जीनं आफ्रिदीच्या या समाजकार्याचे कौतुक केले होते. त्यावरून नेटिझन्सने त्याच्यावर जोरदार टीका केली. त्याला भज्जीनं उत्तर दिलं.
आता भज्जी नेटिझन्ससाठी एक क्विज घेऊन आला आहे. त्यानं आठ खेळाडूंचे फोटो टाकले आहेत. त्या फोटोत खेळाडूंच्या स्टाईल्सचे आहेत. त्यावरून त्यानं खेळाडू कोण, हे ओळखण्यास सांगितले आहेत.
तुम्हचे उत्तर बरोबर आहे का ते तपासा...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
स्टीव्ह स्मिथ शोकमग्न; सोशल मीडियावरून दिली दुःखद बातमी
Andrew Flintoffचा अजब दावा; म्हणे पृथ्वी गोलाकार नाही, तर...
EXPENSIVE: हार्दिक पांड्याच्या शर्टची किंमत ऐकून येईल चक्कर; इतक्या रुपयात येतील 30-40 ब्रांडेड शर्ट
पाकिस्तानला पडतंय ICCच्या स्पर्धा आयोजनाचं स्वप्न; दावा सांगण्याची तयारी
'या' Hot खेळाडूसोबत टीम इंडियाच्या फलंदाजाला जायचंय डिनरला!
धक्कादायक; Corona Virus मुळे कर्ट अँगलसह अनेक WWE स्टार्स करारमुक्त
कोरोना व्हायरसमुळे स्टार खेळाडूच्या आईचे निधन; महिनाभर सुरू होता संघर्ष