Join us  

आर्यनची झाली 'अनया'! भारतीय माजी क्रिकेटपटूच्या मुलाने केलं 'हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन'; 'मुलगी' बनल्याने आनंदी

Aryan Bangar to Anaya, hormonal transformation: संजय बांगरचा मुलगा आर्यन याने स्वत:चे मुलापासून मुलीत झालेले रूपांतर दाखवले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 10:47 AM

Open in App

Aryan Bangar to Anaya, hormonal transformation: माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्याद्वारे त्याच्याबद्दल एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. हा व्हिडिओ त्याच्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशनचा आहे. साध्या भाषेत सांगायचे तर, या व्हिडिओमध्ये बांगरचा मुलगा आर्यन याने स्वत:चे मुलापासून मुलीत झालेले रूपांतर दाखवले आहे. आर्यन बांगरने त्याच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे विराट, धोनी आणि त्याच्या वडिलांसोबतचे फोटो आहेत. त्यानंतर हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन नंतरचे काही फोटोदेखील दिसत आहेत. १० महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यन अखेर अनया म्हणजेच मुलगी बनला आहे.\

आर्यनदेखील वडिलांसारखा क्रिकेटर

आर्यन बांगर हा देखील त्याच्या वडिलांसारखा क्रिकेटपटू आहे. तो डावखुरा फलंदाज आहे आणि इस्लाम जिमखाना या स्थानिक क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळतो. याशिवाय तो लीसेस्टरशायरमधील हिंकल क्रिकेट क्लबसाठीही फलंदाज म्हणून खेळला आहे.

'अनया' झाल्यानंतर आर्यन खुश

मुलीत रुपांतर होऊन आर्यन आता अनया बनला आहे आणि खूप आनंदी आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले. पण या खेळाशिवाय, एक वेगळा प्रवासदेखील आहे, जो माझ्या स्वतःशी संबंधित आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील परिणाम हा माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.

'अनया'चे मँचेस्टरमध्ये वास्तव्य

'अनया' बनल्यानंतर तो सध्या इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये राहतो. मात्र, तो कोणत्या क्रिकेट क्लबचा भाग आहे की नाही हे निश्चितपणे सांगता येणार नाही. सध्यातरी त्याच्या इंस्टाग्राम रीलवरून असे दिसून आले आहे की त्याने तेथे खेळल्या गेलेल्या एका सामन्यात १४५ धावा केल्या आहेत.

टॅग्स :ट्रान्सजेंडरभारतीय क्रिकेट संघऑफ द फिल्ड