Har Ghar Tiranga:सचिनपासून ते धोनी आणि रोहितपर्यंत; स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाच्या रंगात अवघं क्रिकेट विश्व

१५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 11:18 AM2022-08-14T11:18:58+5:302022-08-14T11:20:30+5:30

whatsapp join usJoin us
From Sachin Tendulkar, Dhoni to Rohit Sharma, Indian cricketers participated in the Har Ghar Tricolor campaign | Har Ghar Tiranga:सचिनपासून ते धोनी आणि रोहितपर्यंत; स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाच्या रंगात अवघं क्रिकेट विश्व

Har Ghar Tiranga:सचिनपासून ते धोनी आणि रोहितपर्यंत; स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाच्या रंगात अवघं क्रिकेट विश्व

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : १५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारत सरकारकडून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील नागरिक सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो आपल्या प्रोफाईल फोटोवर ठेवत आहेत. देशभरातील अनेक कलाकारांसह अनेक दिग्गजांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडूंनी देखील सहभाग घेऊन तिरंग्याचा फोटो आपल्या प्रोफाईलवर लावला आहे.

'दिल में भी तिरंगा और घर में भी तिरंगा'


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो तिरंग्याला फडकवताना दिसत आहे. सचिन म्हणतो की, तिरंगा नेहमीच आपल्या हृदयात राहिला आहे आणि आज माझ्या देखील घरी फडकत आहे. 'दिल में भी तिरंगा और घर में भी तिरंगा' जय हिंद!, अशा आशयाचे कॅप्शन लिहून सचिनने स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवात सहभाग नोंदवला आहे. 

रोहित शर्माच्या प्रोफाईलवर तिरंगा


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या प्रोफाईलवर तिरंग्याचा फोटो लावून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. देशभरातील अनेक दिग्गज मंडळी तिरंगा आपल्या प्रोफाईलवर ठेवून स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत.

 भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरैश रैनाने देखील तिरंग्याचा फोटो लावून तमाम देशवासियांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि सध्याचा खासदार गौतम गंभीर याने देखील तिरंग्याचा डीपी लावून या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. 

धोनीने बदलला प्रोफाईल फोटो

महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी इंस्टाग्रामवरील आपला प्रोफाईल फोटो बदलला आणि तिरंग्याचा फोटो लावला. या फोटोवर एक खास संदेश देखील लिहण्यात आला आहे. "माझे भाग्य आहे की मी एक भारतीय आहे", असे म्हणत धोनीने देशवासियांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला धोनी सोशल मीडियावर खूप कमी सक्रिय असतो. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर धोनीने मोठ्या कालावधीपासून एकही पोस्ट केली नाही. मात्र 'हर घर तिरंगा' या मोहिमेत सहभागी होऊन चाहत्यांना एक संदेश दिला आहे.

विराट कोहली अमृतमहोत्सवाच्या रंगात

इरफान पठानच्या व्हिडीओने जिंकली मने


भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो तिरंग्यासमोर उभा राहून या मोहिमेत सहभागी होण्याचे देशवासियांना आवाहन करत आहे. इरफान पठाणच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी इरफानचे कौतुक करत आहेत. 

Web Title: From Sachin Tendulkar, Dhoni to Rohit Sharma, Indian cricketers participated in the Har Ghar Tricolor campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.