नवी दिल्ली : १५ ऑगस्ट २०२२ रोजी देश आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारत सरकारकडून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील नागरिक सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो आपल्या प्रोफाईल फोटोवर ठेवत आहेत. देशभरातील अनेक कलाकारांसह अनेक दिग्गजांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघातील आजी माजी खेळाडूंनी देखील सहभाग घेऊन तिरंग्याचा फोटो आपल्या प्रोफाईलवर लावला आहे.
'दिल में भी तिरंगा और घर में भी तिरंगा'
रोहित शर्माच्या प्रोफाईलवर तिरंगा
भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरैश रैनाने देखील तिरंग्याचा फोटो लावून तमाम देशवासियांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि सध्याचा खासदार गौतम गंभीर याने देखील तिरंग्याचा डीपी लावून या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे.
धोनीने बदलला प्रोफाईल फोटो
महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी इंस्टाग्रामवरील आपला प्रोफाईल फोटो बदलला आणि तिरंग्याचा फोटो लावला. या फोटोवर एक खास संदेश देखील लिहण्यात आला आहे. "माझे भाग्य आहे की मी एक भारतीय आहे", असे म्हणत धोनीने देशवासियांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला धोनी सोशल मीडियावर खूप कमी सक्रिय असतो. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर धोनीने मोठ्या कालावधीपासून एकही पोस्ट केली नाही. मात्र 'हर घर तिरंगा' या मोहिमेत सहभागी होऊन चाहत्यांना एक संदेश दिला आहे.
विराट कोहली अमृतमहोत्सवाच्या रंगात
इरफान पठानच्या व्हिडीओने जिंकली मने