A look at winners of 2021 ICC Awards announced so far : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) 2021 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम संघ आदी जवळपास सर्व पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2021च्या वर्षात पाकिस्तानी खेळाडूंचा दबदबा जाणवला आणि त्यामुळेच आयसीसी पुरस्कारांमध्येही त्यांच्याच खेळाडूंनी बाजी मारली. भारताचा आर अश्विन वगळता एकाही खेळाडूचं नाव साध्या नामांकनासाठीही निवडले गेले नाही. तसेच, ट्वेंटी-20 व वन डे संघातही एकाही भारतीयाला स्थान मिळाले नाही. भारतीय पुरूष क्रिकेटपटूंनी निराश केलेले असताना महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना ( Smriti Mandhana) हिनं भारतीयांची शान वाढवताना 2021मधील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूटनं वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा मान पटकावला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमनं वन डेतील, तर मोहम्मद रिझवाननं ट्वेंटी-20तील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला.
जाणून घ्या ICC Awards 2021ची संपूर्ण लिस्ट
- आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेटपटू - टॅमी बीयूमौंट ( इंग्लंड )
- राचेल हेयहो फ्लिंट ट्रॉफी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू - स्मृती मानधना ( भारत)
- उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू - फातिमा सना ( पाकिस्तान)
- संलग्न संघटनांमधील सर्वोत्तम महिला खेळाडू - अँड्रीया-मे जेपेडा ( ऑस्ट्रीया)
- कसोटीतील सर्वोत्तम पुरुष खेळाडू - जो रूट ( इंग्लंड)
- ट्वेंटी-20तील सर्वोत्तम पुरुष खेळाडू - मोहम्मद रिझवान ( पाकिस्तान)
- उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू - येनमन मलान ( दक्षिण आफ्रिका)
- संलग्न संघटनांमधील सर्वोत्तम पुरूष खेळाडू - झिशान मक्सूद ( ओमान)
- सर्वोत्तम अम्पायर - माराईस इरास्मस
- वन डेतील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू - बाबर आजम ( पाकिस्तान)
- सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू - शाहिन आफ्रिदी
आयसीसीचा सर्वोत्तम संघ
- पुरुष कसोटी संघ - दिमुथ करुणारत्ने, रोहित शर्मा, मार्नस लाबुशेन, जो रूट, केन विलियम्सम ( कर्णधार), फवाद आलम, रिषभ पंत, आर अश्विन, कायले जेमिन्सन, हसन अली, शाहिन आफ्रिदी
- पुरुष वन डे संघ - पॉल स्टिर्लिंग, येनमन मलान, बाबर आजम ( कर्णधार), फाखर जमान, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, शाकिब अल हसन, मुश्फीकर रहिम, वनिंदू हसरंगा, मुस्ताफिजूर रहमान, सिमि सिंग, दुश्मंथा चमिरा
- पुरुष ट्वेंटी-20 संघ - जोस बटलर, मोहम्मद रिझवान, बाबर आजम ( कर्णधार), एडन मार्कराम, मिचेल मार्श, डेव्हिड मिलर, वनिंदू हसरंगा, तब्रेझ शम्सी, जोश हेझलवूड, मुस्ताफिजूर रहमान, शाहिन आफ्रिदी
Web Title: From Smriti Mandhana to Babar Azam: A look at winners of 2021 ICC Awards announced so far
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.